पृथ्वीच्या पाठीवर प्रारंभापासूनच विविध प्रकारच्या प्राण्यांचा सजीवांचा जीवनकलह सुरू आहे. त्यातून जे वाचले ती आपली सृष्टी. या जीवनकलहाचा प्रवास आणि त्यामागील कारणे सांगणारे उत्तम पुस्तक. प्रा. विजय घुगे सजीवांचे जीवनकलह लेखक : गो. बा. सरदेसाई पाने : ९६, किंमत : १०० रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130 […]
खेडोपाडी पसरलेल्या मराठी वाचकांची वाचनाची भूक लहानमोठी वाचनालये भागवित असतात. ही ग्रंथालये चालविणार्या कार्यकर्त्यांना ती कमी श्रमात अधिक चांगली चालविता यावी. शासनाच्या नियमांनुसार त्यांची कार्यवाही असावी. सर्व शासकीय योजना-माहितीचा लाभ घेऊन आपल्या ग्रंथालयांची स्थिती त्यांना अधिक चांगली करता यावी. याकरिता लागणारी सर्व ताजी माहिती एकत्र नीट वर्गीकृत स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा व त्यातून ग्रंथालय चळवळीला हातभार लावणारे सार्वजनिक ग्रंथालय मार्गदर्शक. नचिकेत प्रकाशन 24, योगक्षेम ले-आऊट, स्नेह नगर, वर्धा रोड, नागपूर -440 015. पाने : ११२, किंमत : २०० रु. […]
नागरी बॅंका/पतसंस्था किंवा कोणत्याही संस्थेतील सी.ई.ओ.- मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे व्यवस्थापनातील वजिराचे प्यादे असते. .ई.ओ ची भूमिका यशस्वीरीत्या निभावणे म्हणजे तारेवरची कसरत असते. ही भूमिका त्याला प्रभावी रीत्या निभाविता यावी, यासाठी त्याची नेमकी बाबदारी काय? भूमिका कार्य? र्यादा काय? यांचे सांगोपांग विवेचन व मार्गदर्शन शाखा व्यवस्थापन या लोकप्रिय व दुसरी आवृत्ती निघालेल्या पुस्तकाचे लेखक व नागरी बॅंकांचा प्रदीर्घ अनुभव सणारे डॉ. माधव गोगटे यांनी या पुस्तकातून केले आहे.नचिकेत प्रकाशन पाने : १४४ किंमत : २५० रु. […]
ब्रिटिश कालखंडामध्ये स्थानिक प्रशासन सुकर व्हावे, तत्कालीन जिल्हाधिकार्याला या भूप्रदेशाची पूरेशी माहिती असावी आणि येथील जाती, जमातीचे तपशिल ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या सोयीसाठी म्हणून ज्ञात व्हावे हा मुख्य हेतू मनात ठेवून येथील जास्तीत जास्त महसूल वसुलीच्या दृष्टीने आवश्यक तपशील पुरवणारा ग्रंथ म्हणून जिल्हा गॅझेटिअर्सची निर्मिती झाली. […]
सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण भागात गेली १२ वर्षे वास्तव्याला असलेल्या डॉ. संजीव चौबळ यांनी केलेले अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण. अमेरिकेतील मोठमोठ्या शहरांमध्ये रहाणार्या बहुतांश मराठी लोकांनीही ग्रामीण अमेरिकेचा हा पैलू अनुभवलेला नाही. भारतात राहून अमेरिकेची झगझगीत आणि भव्यदिव्य कल्पनाचित्रे रेखाटणार्या मंडळींना हे पुस्तक वाचून वास्तवाचे नक्कीच भान येईल. […]
मराठी चित्रपटसृष्टीतच नव्हे तर एकूण भारतीय चित्रपटसृष्टीतच दर्जेदार चरित्रपटांची वानवा आहे. शंभर वर्षांची परंपरा सांगणार्या भारतीय चित्रपटसृष्टीला खरं तर अशोभनीय अशी ही बाब आहे. परंतु, ही बाब ठळकपणे जाणवून देणारी एक आशादायक घटना म्हणजे ‘“बालगंधर्व”’ हा चित्रपट! […]
दैनिक प्रत्यक्ष हे वृत्तपत्र श्री अनिरुद्ध बापू यांनी सन २००५च्या दत्तजयंतीच्या दिवशी प्रसिद्ध केले. हे दैनिक १२ पानांचे असून त्याची किंमत रु.२.५० आहे. दैनिक प्रत्यक्ष सर्व वृत्तपत्रांचे स्टोल तसेच रेल्वे स्टोलवरही उपलब्ध आहे. तसेच घरोघरी येणाऱ्या अन्य वृत्तपत्रा प्रमाणे ही मिळते. प्रत्यक्ष दैनिकात परमपूज्य सदगुरु बापू यांनी लिहिलेले अग्रलेख व विविध विषयांवरील इतर लेखकांनी लिहिलेले लेखही वाचकांस वाचावयास मिळतील. पान चार आणि पाचवर आंतरराष्ट्रीय सदरात विविध माहिती आहे जी इतर वृत्तपत्रात अभावानेच वाचायला मिळते. […]
पावसाळ्यात येणारे सण व उसत्व आपल्याला नेहेमीच आनंद देत आले आहेत. गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या सर्वच वस्तूंचे भाव गगनाला भिडाल्यामुळे मुर्तींच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत त्यात बऱ्याच मूर्तिकारांच्या काही ना काही अडचणी आहेत. कोणाला जागेची तर कोणाला कारागिरांची तर कोणाला महागाईची. मुंबईवर वारंवार होणाऱ्या दहशतवाद्यांच्या हल्याने मुंबईचे जीवन असुरक्षित तसेच मुंबईतील नागरिकांच्या जीवावर बेतले आहे. कुठल्या क्षणी काय होईल याची काही शास्वती राहिलेली नाही. त्याचे सोयर-सुतक ना शासनाला व शासन चालवणाऱ्यांना मंत्र्यांना आहे. आता प्रत्येकानीच दक्ष राहिले पाहिजे व काही संशयास्पद आढळले तर त्याची खबर त्वरित पोलीस यंत्रणांना दिली पाहिजे. येणाऱ्या सार्वजनीक गणेशोत्सवाच्या निमित्ताने पूढील बदल सुचवावेसे वाटतात पण निर्णय सर्वानुमतेच व्हावा ही विनंती […]