१९६५ आणि १९८५ साली मानव्य आणि प्रियकर-प्रेयसी यांच्यातील प्रेम किती जिवंत,हळुवार, रसरशीत, नाजूक आणि भिडून जाणारं होतं याचा प्रत्यय काल “सीता रामम ” बघताना आला. मूळ भाषा तेलगू असली (with English subtitles) तरी दर्जेदार कलाकृती कायम भाषेच्या अडसरांना ओलांडून “ये हृदयीचे ते हृदयी ” पोहोचविते याचा हा दुसरा अनुभव. पहिल्यांदा पुलंनी कौतुक केलेला “शंकराभरणं ” एका […]
मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांनी अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. ‘मोरुची मावशी’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती. […]
स्वप्नांचे पंख लेऊन, सूर्यमंडळाला भेदू इच्छिणारी त्यांची गरुड झेप, आपल्या सर्वांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. मराठी शब्दांशी होणारी झटापट सुलभ करणाऱ्या मिलिंद सरवटे या माझ्या मित्रास आणि माझ्या कोणत्याही लेखनाला पॉलिश करण्याचं काम तत्परतेने आणि आवडीने करणारे डिमेलोसर यांच्या मी ऋणातच राहू इच्छिते. […]
मी प्रदीर्घ साधना आणि कसोटीच्या काळात गेलो ज्यांचा संदर्भ आवश्यक आहे. याशिवाय सर्वसंग परित्याग, मुक्तीची अतीव ओढ, भक्ती, योग्य गुरू या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्या विचारात घेतल्याच पाहिजेत. या गोष्टी विचारात घेतल्या तरच पुस्तकातील विचारांना अर्थ राहील आणि वाचकांना त्याचा लाभ होईल. […]
कवयित्री आशा अशोक डांगे यांचा ” प्रिय, हा कण गॉड पार्टिकल आहे’ हा दुसरा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या अगोदरच्या ‘परिघाबाहेर’ या काव्यसंग्रहातील कविता अभ्यासकांच्या व वाचकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. […]
मुखपृष्ठ आवडले म्हणून पुस्तक खरेदी करणारे माझ्या तरी कोणी पाहण्यात नाही. ते पुस्तकाबरोबर “फ्री ” असते. आतील भलाथोरला कन्टेन्ट एका बाजूला (फार तर मलपृष्ठावर) चितारते आणि पुस्तकाची द्वाही फिरवते. पण मुखपृष्ठांबद्दलच एखादे पुस्तक निघाले तर? […]
हे पुस्तक वाचताना भान हरपल्यासारखे होते.. आणि पुस्तक संपताना खूप ओकबोकं वाटू लागत..अचानक एवढ्या मैत्रिणींच्या गराड्यातून व त्या निसर्गरम्य गावातून बाहेर फेकलं गेल्यासारखं वाटतं.. लेखिकेचा हात सुटल्यासारखा वाटतो, इतकं ते अनुभव वाचतांना आपण एकरूप झालेलो असतो. वाचन संपतं परंतु त्या एकटेपणातही त्या मनोरम आठवणी ते प्रसंग मेंदूत घोळत राहतात.. मनात रेंगाळत राहतात. […]
मनोविकास प्रकाशन संस्थेने तामिळ लेखिका सलमा यांचे व सोनाली नवांगुळ यांनी अनुवाद केलेले पुस्तक ज्याला साहित्य अकादमीचा नुकताच पुरस्कार मिळाला हे पुस्तक प्रसिद्ध केलं आहे. या कादंबरीला उत्कृष्ट अनुवादिसाठी साहित्य अकादमीने पुरस्कार देऊन गौरविलेली आहे. तसे प्रत्येकाचे तास ज्याचे त्याचेच असतात. जिथे प्रेम आहे तिथे काही तासावर दुसऱ्यांचीही हुकुमत असते. मध्यरात्रीनंतरचे तास आपल्या हातात नसतात, त्यांच्यावर आठवणींची, विचारांची,शरीराची, प्रेमाची, वासनेची हुकुमत असतें.लैंगिक घुसमट होणाऱ्यांची मध्यरात्रीनंतर अवस्था बेचैन करणारी असतें. […]
राहुलच्या किर्तीमुळे, यू -ट्यूब मुळे शास्त्रीय संगीताकडे वळलेली तरुण पिढी काल मोठ्या संख्येने चित्रपट गृहात होती. अन्यथा १९८३ साली निवर्तलेल्या या सूर्यासारखे दाहक गाणाऱ्या गायकासाठी चाळीस वर्षांनी नवी माणसे (जी कदाचित त्यावेळी जन्मलेलीही नसतील) फिरकली नसती. […]
आपण असं शिकायला हवं जणू आपण नेहमीसाठी जगणार आहोत आणि असं जगायला हवं जणू उद्याच मरणार आहोत. विद्येसारखा बंधू नाही. विद्येसारखा मित्र नाही. विद्येसारखे धन नाही, आणि विद्येसारखे सुखही नाही. […]