शिवसूत्र – यशस्वी जीवनाचा महामंत्र
ध्येयवेडाने झपाटलेल्या प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून वाचावे असे क्रांतीकारी पुस्तक […]
विविध प्रकारची परिक्षणे आणि परिचय
ध्येयवेडाने झपाटलेल्या प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून वाचावे असे क्रांतीकारी पुस्तक […]
चित्रपट बघितल्या बघितल्या शक्यतो मी त्यांवर लगेच व्यक्त होत नाही, कारण त्याला टिपिकल ” परीक्षणाचा ” वास येतो. मी सावकाश आतमध्ये मुरवत, त्यांवर माझे आकलन/भाष्य व्यक्त करीत असतो. मात्र आज हा अपवाद ! शक्यतो आकलनाचा सूर लावतोय. ” श्वास “, ” दिठी “, ” अस्तु ” यांनी गाठलेली उंची आणि जगभरातील चित्ररसिकांना ज्या मराठीतील चित्रकृतींची नोंद घ्यावीच लागेल या माळेतील “पांघरूण ” हा चित्रपट आहे. […]
” कोटा फॅक्टरी ” ने अभियांत्रिकी शिक्षण /प्रवेश परीक्षा आणि तरुणांचे कोमेजणे दोन सेशन्स मधून प्रभावीपणे मांडले. आता बघितली – “द व्हिसल ब्लोअर ! ” […]
हे एक “झोपमोड ” करणारे नाटक आहे (संदर्भ -लोकसत्ता परीक्षणातील शब्दप्रयोग ) म्हणून २६ जानेवारीचा दुपारचा प्रयोग झोपमोड करून आम्ही बालगंधर्वला पाहिला. अल्पावधीतला रौप्यमहोत्सवी प्रयोग त्यामुळे सनई -चौघडे , उत्सवी धावपळ , चंद्रकांत कुलकर्णी (दिग्दर्शक), मोहन आगाशे वगैरे दिसले. आमच्या यादीत हे नाटक होतेच , पण अचानक २५ ता. ला रात्री ” गुलजार -बात पश्मीनेकी ” हा कार्यक्रम रांग मोडून दांडगाईने पुढे घुसला. […]
पंधरा कथा असलेले आणि केवळ ८८ पानांचे हे पुस्तक, मराठी कायदेविषयक साहित्यातील एक अमूल्य ठेवा बनून राहिले आहे. लेखिका बागेश्री ताई , या कुटुंब न्यायालयाच्या निवृत् न्यायाधीश आहेत . तसेच गेली चाळीस वर्षे मॅरेज कौन्सिलिंग नंतर न्यायदान आणि त्यानंतर ज्येष्ठांचे कौन्सिलिंग करीत असताना त्यांना जे अनुभव आले ते केसेस आणि कथांद्वारे त्यांनी लिहिले आहेत. […]
आपल्या पाडसांपासून तात्पुरते/कायमचे दुरावलेले नव्याने जुनंच जगायला लागतात- रुहमें फासले नहीं होते ! “क्लब ६०” हा असा दुर्लक्षित शिक्षक ! वयाच्या उताराला लागल्यावर त्या टप्प्याचे शिक्षण देणारा !! […]
अशा मालिकेतला २०१९ चा एक चित्रपट अचानक नेटफ्लिक्स वर दिसला- The Sky is pink ! आयेशा चौधरीच्या सत्यकथेवर आधारीत हा चित्रपट आवडून गेला. नांव असं का ठेवलंय, खूप वेळ संदर्भ लागला नाही. मग ट्यूब पेटली- आजकालच्या परिभाषेत प्रसूतिगृहात बाळ जन्माला आले की मुलगा असेल तर ब्लू आणि कन्यारत्न झाले असेल तर पिंक असं म्हणायची पद्धत आहे. […]
मूल जन्माला आलं की हल्लीचे पालक त्याचं पुढिल भविष्य ठरवायला जणू काही तयारच असतात. ही विचारसरणी सध्या सुशिक्षित पालकांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळते. माझा मुलगा मोठा झाला की तो एखादा डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावा. नाही तर मग एखादी UPSC किंवा MPSC ची परीक्षा पास होऊन ऑफिसर बनून कमिशनर किंवा कलेक्टर तरी व्हावा अशी बऱ्याच पालकांची मनोमन इच्छा असते . त्यासाठी ते मुलांना तशा प्रकारचे वातावरण सुद्धा बहाल करत असतात. लेखक हे स्वतः त्या परिस्थितीतून गेलेले असल्यामुळे त्यातील वर्णन अधिकच जिवंत आणि वास्तववादी वाटतात. लेखकाचं हे पहिलंच पुस्तक असलं तरी ही कादंबरी वाचताना खिळवून ठेवते. प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला वाटेल की हे सर्व माझ्याशी निगडित असंच लिखाण आहे. […]
हा चित्रपट दस्तुरखुद्द अमिताभ आणि रेखाच्याही स्मरणात असणे तसे अवघड ! त्यांच्या कोठल्याही चार्टबस्टर / अमुक-तमुक कोटी घराण्यातील नाही. प्रेक्षकांचा फारसा प्रतिसादही नसलेला ! […]
सुरुवातीला संगणक प्रचंड मोठा होता, मोठमोठ्या खोल्या भरून जायच्या, त्यानंतर तो टेबलावर आला, नंतर तो मांडीवरचा संगणक बनला, मग हातात मावेल एवढा छोटा झाला; आणि आता तर तो आपल्या अंगावर मिरवायला लागलाय. आपली महत्त्वाची कामे असोत, आपल्या ज्ञानात वृद्धी करायची असो, की आपले मनोरंजन करायचे असो, हे सगळे आता ही संगणकावरील आधारित अंगावरची यंत्रं करताहेत. यांचीच माहिती देतोय हा लेख… […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions