ऐतिहासिक पुराव्यां अभावी एक सर्वमान्य निष्कर्ष असा आहे की – मीरा कृष्णभक्त होती , तिने कृष्णभक्तीपर रचना केल्या (ज्या कधींच्याच अक्षर वाङ्मयांत सामील झालेल्या आहेत) आणि ती नि:संशय भक्ती संप्रदायातील एक महत्वाची संत कवयित्रीं होती. गुलजारसारख्या अंतर्बाह्य कवीला यापेक्षा अधिक काय हवे? […]
गुलजारच्या चित्रपटांची नावे विचारात टाकतात. कथावास्तूशी असणारा त्यांचा संबंध जोडणे इतके सोपे नसते. “हुतूतू ” पाहायला मी पुण्याच्या सोनमर्ग चित्रपटगृहात दुपारी गेलो तेव्हा याच विचारात होतो. बघायला सुरुवात केल्यावर नेहेमीप्रमाणे गुंगून गेलो. […]
एकाच छताखाली राहणारी ,रक्ताचे नाते असणारी मंडळी एकमेकांना “परिचित “असतीलच असे नाही. सध्याच्या काळात तर हे ठळकपणे अधोरेखित होतंय. एक नितांतसुंदर ,कॊटुंबिक ,अभिनयसंपन्न चित्रपट म्हणजे “परिचय ” ! यात रूढार्थाने प्रेमकहाणी नाही ,खलनायक नाही , रक्त वगैरे चुकूनही नाही (नाही म्हणायला आजारी संजीवकुमार खोकतो ,तेव्हा रक्ताचे डाग दिसतात.) अढी ,गैरसमज ,अहंकार यामुळे निरगाठी पडलेली नातेवाईक मंडळी येथे अपरिहार्यपणे (आणि सुरुवातीलातरी मनाविरुद्ध ) एकत्र राहात असतात. त्यांचाही नियतीमुळे नाईलाज झालेला असतो. […]
हे पुस्तक आशाताई कुलकर्णी यांनी २०१८ मध्येच मला सप्रेम भेट म्हणून दिले होते. त्यावेळी मी ते पुस्तक वाचून काढले होते, पण पंधरा दिवसांपूर्वी ते पुस्तक मी वाचू लागले आणि त्यातला सखोल आणि सुयोग्य अर्थ, खरेपणा मला जाणवू लागला. हा धडपडणारा विद्यार्थी म्हणजे, तरुण वयातच भारावून जाऊन, देश आणि लोक सेवाकार्यात झोकून देणारा ‘दामोदर बळवंत कुलकर्णी”, म्हणजेच साने गुरुजींचा दामू ! ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ हा त्यांचा सामाजिक कार्याचा गाभाच आणि मूलतत्वच होते. […]
“कोशिश” हा हिंदी नव्हें तर भारतीय चित्रसृष्टीतील मैलाचा दगड आहे. हा एकच चित्रपट करून गुलजार ,संजीवकुमार ,जया भादुरी आणि असरानी थांबले असते तरी चिरकाल आपल्या स्मरणात राहिले असते .नाही म्हणायला आपले प्रेक्षक म्हणून अपरिमित नुकसान झाले असते हा भाग अलाहिदा . कारण कोशिश नंतरही त्यांनी आपल्याला एकाहून एक नजराणे बहाल करून श्रीमंत करून टाकलेले आहे. […]
विनोदाची खूप रूपे आहेत. मराठीजनांना “पुलंच्या “रूपाने निखळ विनोद काय असतो याचा प्रदीर्घ अनुभव आहे. ऍक्शन विनोद बऱ्याच जणांना आवडतो. द्वयर्थी विनोदानेही एकेकाळी धुमाकूळ घातला होता. प्रत्येक कलावंताची स्वतंत्र शैली असते. विनोदाचा शिडकावा दैनंदिन जीवनात कोणाला नको असतो? पण काहीतरी अंगविक्षेप करून /चाळे करून तात्कालिक हसू फ़ुटेलही पण गुलजारसारखी व्यक्ती तेथेही आपल्या अभिजाततेचा हात सोडत नाही. “अंगूर ” हा परिस्थितीजन्य विनोदाचा एक उत्तम नमुना आहे. […]
ग्रामीण संस्कृतीवर भाष्य करणारा हा चित्रपट – काहिसा दुर्लक्षित ! यात राजकारण नाही ,अतिरेकी नाहीत फक्त एक छोटासा जीव असलेले कथाबीज आहे. अशा विषयावर इतकी सुंदर चित्रकृती निर्माण करणे फक्त गुलजारसारख्या प्रतिभावंताला जमू शकते. […]
अपवाद सोडले तर जगात सगळ्यांना ईझीमनी हवा असतो . कष्ट न करता , किंवा अगदी कमीतकमी कष्टात जास्त पैसे मिळवणं हे अनेकांच्या आयुष्याचं ध्येय असतं . त्यासाठी जगन्मान्य असा मार्ग म्हणजे शेअर बाजार. […]
निवृत्त न्यायाधीश मा. प्रदीप जोशी यांनी भारतातील या असंभव, अशक्यप्राय संकल्पनेवर लिहिलेलं, भारतीय विचार साधनेतर्फे ३० जून २०२१ ला प्रकाशित झालेलं हे पुस्तक काल श्री किशोर शशीतल आणि डॉ मुकेश कसबेकर यांनी माझ्या हाती ठेवले. […]