भारतीय रसायनशास्त्रज्ञ प्रा. एस. के. के. जतकर
प्रा. जतकर हे पुणे विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाचे पहिले प्रमुख होते. ते नोबेल पुरस्कारविजेते डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण यांचे सहकारी. त्यांचे संपूर्ण नाव शंकर खंडो कुलकर्णी जतकर. ते मुळातले सांगली जिल्ह्यातल्या जत गावचे. त्यांनी बंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एम. एस्सी. केले. प्रथम ते हैदराबादच्या निजाम महाविद्यालयात अध्यापनासाठी गेले, पण संशोधनाची तीव्र इच्छा असल्याने तेबंगलोरच्या परत इंडियन […]