अखंड खंड
पृथ्वी ही भौगोलिकदृष्ट्या सात खंडांत विभागली आहे. त्यातील काही खंडांचे भूभाग हे एकमेकांना जोडले आहेत, तर काही खंडांचे भूभाग एकमेकांपासून अगदी वेगळे आहेत. उदाहरणार्थ, उत्तर आणि दक्षिण अमेरीका या खंडांचा भूभाग हा युरोप, आफ्रिका आणि आशिआ या खंडांच्या भूभागापासून पूर्ण वेगळा आहे. तसंच ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिकाच्या भूभागांना स्वतंत्र अस्तित्व आहे. परंतु आज वेगवेगळं अस्तित्व असलेले हे सगळे भूभाग, काही कोटी वर्षांपूर्वी एका महाखंडाच्या स्वरूपात एकत्र वसले होते. […]