नवीन लेखन...

विज्ञान / तंत्रज्ञान

थ्री जी तंत्रज्ञान

सेलफोन म्हणजे मोबाईलमध्ये तंत्रज्ञानाची जी स्थित्यंतरे आली त्यात थ्री-जी तंत्रज्ञान हे एक आहे. थ्री-जी याचा अर्थ थर्ड जनरेशन असा आहे. थोडक्यात मोबाईल ज्याच्या आधारे चालतो त्या तंत्रज्ञानाची तिसरी आवृत्ती सध्या भारतात वापरली जात आहे. […]

इनव्हर्टर

आजच्या लोडशेडिंगच्या जमान्यात इनव्हर्टर हे यंत्र सर्वांना परिचयाचे झाले आहे. ‘… इनव्हर्टर असेल तर सारं चालेल निश्चिंतपणे’ ही जाहिरातही आपण पाहतो आहोतच, वीज नसली तर आपली घरातील सर्व उपकरणे बंद पडतात, पण इनव्हर्टरमुळे आपण ती वीज नसतानाही काही काळासाठी चालवू शकतो अगदी संगणकासोबत आपण जो यूपीएस वापरतो तो इनव्हर्टरचाच प्रकार असतो, त्याला अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय असे म्हणतात. […]

ड्रॅक्यूलाचे अश्रू

सन १८९७मध्ये प्रसिद्ध झालेली, ‘ड्रॅक्यूला’ ही ब्रॅम स्टॉकर यांची कादंबरी म्हणजे एक भयकथा आहे. ही कादंबरी इतकी लोकप्रिय झाली, की त्यावर अनेक चित्रपटही निघाले. या कादंबरीतलं ड्रॅक्यूला हे पात्र रक्तपिपासू आहे. हे पात्र लेखकानं, रोमानिआमधील वॉलॅशिआ प्रदेशात पंधराव्या शतकात होऊन गेलेल्या, व्लाद (तिसरा) या क्रूर लष्करी सरदारावर बेतलं असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. कारण, या कांदबरीलाही आजच्या रोमानिआची पार्श्वभूमी लाभली आहे आणि तिसरा व्लाद हा स्वतः ‘ड्रॅक्यूल्ये’ या नावानंही ओळखला जायचा. […]

ब्लू रे डिस्क

सीडी व डीव्हीडी यांच्यापेक्षाही अधिक सरस असे तंत्रज्ञान असलेल्या ब्लू रे डिस्कचा जन्म अलीकडच्या काळातील आहे. डीव्हीडीनंतर विकसित झालेले हे तंत्रज्ञान आहे. ब्लू रे डिस्कला बीडी असे संक्षिप्त नाव आहे. डीव्हीडीप्रमाणेच ही ऑप्टिकल डिस्क असून सीडी व डीव्हीडी या दोन्हीतील कमतरता यात भरून काढल्या आहेत. […]

ग्राफिक कार्ड

अलिकडच्या काळात कुठल्याही वस्तूचे डिझाईन कसे असावे याला बरेच महत्त्व आहे. संगणकावरही अशा प्रकारे डिझायनिंग करता येते. त्याला संगणक आरेखन असे म्हणतात. ग्राफिक्स हा त्याचाच एक भाग म्हणता येईल. […]

ब्लूटूथ तंत्रज्ञान

ब्लूटूथ हे संदेशवहनाचे एक तंत्रज्ञान आहे. विशेष म्हणजे यात कुठल्याही वायरचा वापर न करता एकमेकांशी संपर्क प्रस्थापित करता येतो, तसेच माहितीची देवाणघेवाणही सुरक्षितपणे करता येते. […]

हार्ड डिस्क

पूर्वीच्या काळी जे शब्द फक्त विज्ञान किंवा तंत्रज्ञान शिकलेल्या माणसांच्या तोंडी असायचे ते आता सर्वांनाच परिचयाचे झाले आहेत. संगणक क्षेत्राशी संबंधित असलेला असाच एक शब्द म्हणजे हार्ड डिस्क. हार्ड डिस्क म्हणजे आपल्या टेबलवर असलेल्या संगणकाचे हृदय असते, ते बंद पडले तर संगणक कामच करू शकत नाही. […]

ब्रॉडबॅण्ड इंटरनेट

एकविसाव्या शतकात ब्रॉडबॅण्डने माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे. इंटरनेट जेव्हा आले, तेव्हा लोकल एरिया नेटवर्क म्हणजे लॅन या सिस्टीमच्या मदतीने काही संगणक एकत्र काम करू शकत होते. इंटरनेटवर जेव्हा आपण एखाद्या विषयाचे सर्च देतो तेव्हा जगातील हजारो संगणकांच्या जाळ्यामार्फत आपल्याला हवी ती माहिती मिळते. याचा अर्थ हे संगणक एकमेकांच्या संपर्कात असतात, माहितीची देवाणघेवाण करीत […]

क्लाउड कॉम्प्युटिंग

एखाद्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीत प्रत्येक कर्मचाऱ्याला काम करण्यासाठी हार्डवेअर (संगणक व यंत्रसामुग्री) व सॉफ्टवेअर (आज्ञावली) उपलब्ध करून द्यावी लागते. केवळ प्रत्येकाला संगणक देऊन भागणार नाही तर सॉफ्टवेअर लायसन्स घ्यावे लागेल. जर नवीन कर्मचारी भरती झाला तर पुन्हा त्याच्यासाठी सॉफ्टवेअर व हार्डवेअर घ्यावे लागेल. […]

प्राचीन चॉकलेट

चॉकलेट किंवा त्याचा कच्चा माल असणाऱ्या कोकोचेउगमस्थान कोणते, हा एक कुतूहलाचा विषय आहे. कारण, हा विषय फक्त चॉकलेट या पदार्थाशी निगडित नसून तो मानवाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीशीही संबंधित आहे. त्यामुळे पुरातत्त्वशास्त्रज्ञांना अधिकाधिक जुन्या चॉकलेटचा किंवा कोकोच्या वापराचा शोध घेण्यात मोठे स्वारस्य आहे. याच संशोधनातून मिळालेली ही माहिती… […]

1 16 17 18 19 20 63
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..