हिंदुस्तान एअरक्राफ्ट – भारतातली पहिली विमान उत्पादक कंपनी
भारत लवकरच स्वतंत्र होईल आणि भारताला जागतिक व आर्थिक घडामोडीत निश्चित महत्वाचे स्थान मिळेल, असा दृढविश्वास असलेले उद्योगपती शेठ वालचंद हिराचंद यांनी डिसेंबर, १९४० मध्ये त्यावेळच्या म्हैसूर संस्थानच्या सहाय्याने हिंदुस्तान एअरक्राफ्ट ही कंपनी बंगलोर येथे स्थापन केली. २३ डिसेंबर, १९४० रोजी नोंदणी झालेली ही संस्था केवळ चार कोटी रुपयांच्या भांडवलावर सुरू झाली. […]