नवीन लेखन...

विज्ञान / तंत्रज्ञान

जनुकीय संरक्षण!

काही प्राणी उष्ण रक्ताचे असतात, तर काही प्राणी थंड रक्ताचे असतात. उष्ण रक्ताचे प्राणी आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित करू शकतात. त्यामुळे उष्ण रक्ताचे प्राणी तापमानातील बदलांना अधिक समर्थपणे तोंड देऊ शकतात. थंड रक्ताच्या प्राण्यांना मात्र शरीराचं तापमान नियंत्रित करता येत नसल्यानं, या थंड रक्ताच्या प्राण्यांची बदलत्या तापमानाला तोंड देण्याची क्षमता मर्यादित असते. […]

वीजनिर्मितीसाठी भारतातील साधन-संपत्ती

आजच आपल्याला विजेचा तुटवडा भासत आहे. विकासाचा नियोजित दर राखायचा तर येत्या दहा वर्षांत भारतातलं विजेचं उत्पादन आजच्या तुलनेत दुप्पट, तर वीस वर्षांत चौपटीहून अधिक होणं गरजेचं आहे. विजेची ही प्रचंड गरज भागवण्यासाठी भविष्यात आपल्याला पारंपरिक पद्धतींचा अधिकाधिक वापर करावा लागणार आहेच, पण त्याबरोबरच पवनऊर्जा, सौरऊर्जा, सागरीऊर्जा यासारख्या आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या अपारंपारिक स्रोतांकडेही विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. […]

भारतातील वीजनिर्मितीच्या विविध पद्धती

भारतात आज निर्माण होणाऱ्या एकूण वीजेपैकी मोठा भाग हा औष्णिक ऊर्जेद्वारे निर्माण होणाऱ्या विजेचा आहे. औष्णिक पद्धतींनी निर्माण केल्या जाणाऱ्या वीजेचं प्रमाण हे एकूण वीज निर्मितीच्या 65 टक्के इतकं आहे. सुमारे 22 टक्के वीज ही जलविद्युत प्रकल्पांद्वारे तर 3 टक्के वीज ही अणुऊर्जेद्वारे निर्माण होते. उर्वरित 10 टक्के वीज ही पवनऊर्जा, सौरऊर्जा यासारख्या इतर अपारंपारिक स्रोतांद्वारे निर्माण होते. […]

फुलपाखरांचं मूळ

फुलपाखरं ही पृथ्वीवरच्या विविध ठिकाणच्या परिसंस्थांतील अत्यंत उपयुक्त घटक आहेत. वनस्पतींच्या प्रजोत्पादन क्रियेत त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. फुलांतील मकरंदाचं सेवन करताना, फुलपाखरं ही या फुलांचं परागीभवन घडवून आणतात. या परागीभवनाद्वारे वनस्पतींच्या पुढच्या पिढीच्या निर्मितीचा पहिला टप्पा गाठला जातो. त्यामुळे, वनस्पतिसृष्टीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या प्राणिसृष्टीतील घटकांचा जन्म केव्हा व कुठे झाला असावा, हे जाणून घेणं औत्सुक्याचं ठरतं. […]

वॉशिंग मशीन

वॉशिंग मशिन शिवाय कुठल्याही गृहिणीचे काम चालू शकत नाही. कपडे धुण्यासाठी हे यंत्र वापरले जाते. आता त्यात स्वयंचलित, अर्धस्वयंचलित असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. त्याचबरोबर त्यांचा आकारही आटोपशीर आहे. […]

अल्पायुषी कडी

शनीची कडी कशी निर्माण झाली असावीत, हा खगोलशास्त्रातील एक चर्चेचा विषय आहे. एका तर्कानुसार या कड्यांची निर्मिती आपल्या ग्रहमालेच्या निर्मितीच्या वेळीच झाली असावी. आपल्या ग्रहमालेतील शनी आणि इतर ग्रह ज्या धुळीच्या आणि वायूच्या मेघातून निर्माण झाले, त्या मेघातूनच ही कडी तयार झाली असावीत. या कड्यांतील पदार्थ म्हणजे पूर्णपणे निर्माण होऊ न शकलेल्या, शनीच्या एखाद्या छोट्या उपग्रहाचे खंड असावेत. […]

हिमनद्यांचा इतिहास

पृथ्वीवर आज जवळपास दोन लाख लहान-मोठ्या हिमनद्या अस्तित्वात आहेत. यांतील काही हिमनद्या अंटार्क्टिकासारख्या अतिथंड ध्रुवीय प्रदेशात आढळतात, तर काही हिमनद्या पृथ्वीवरच्या विविध पर्वतांवर आढळतात. पृथ्वीवर आढळणाऱ्या या सर्व हिमनद्यांचं अस्तित्व पृथ्वीवरील हवामानावर अवलंबून आहे. […]

समुद्रातले ज्वालामुखी

पृथ्वी ही भूशास्त्रीयदृष्ट्या सक्रिय असल्याचं दर्शवणारी एक महत्त्वाची खूण म्हणजे पृथ्वीवरचे ज्वालामुखी. पृथ्वीच्या सक्रियतेचे पुरावे म्हणता येतील असे शेकडो जिवंत आणि मृत ज्वालामुखी पृथ्वीवरच्या जमिनीवर अस्तित्वात आहेत. असे ज्वालामुखी अस्तित्वात असण्याला सागराचा तळही अपवाद नाही. पृथ्वीचा सत्तर टक्के पृष्ठभाग व्यापणाऱ्या या महासागरांतही अचानक उफाळणाऱ्या सक्रिय ज्वालामुखींबरोबरच अनेक निष्क्रिय ज्वालामुखीही दडले आहेत. […]

ताऱ्याचं ग्रहभक्षण

आपल्या सूर्याचं जवळपास निम्मं आयुष्य संपलं आहे. सुमारे पाच अब्ज वर्षांनंतर सूर्य मृत्यू पावणार आहे. त्याचा परिणाम आपल्या ग्रहमालेवर अर्थातच होणार आहे. त्यातही सूर्याच्या जवळ असणाऱ्या ग्रहांचं अस्तित्व संपुष्टात येणार आहे. हे कसं घडून येणार आहे, याची कल्पना देणारी एक घटना संशोधकांनी नुकतीच टिपली आहे. […]

पहिले घोडेस्वार?

घोडा हा आपलं जंगली स्वरूप सोडून माणसाच्या घनिष्ट संपर्कात सर्वात प्रथम सुमारे सहा हजार वर्षांपूर्वी आला असावा. हे घडून आलं ते बहुधा काळ्या समुद्राच्या उत्तरेला असणाऱ्या युरेशिआ स्टेप या गवताळ पठारी प्रदेशाच्या पश्चिम भागात. घोडा माणसाळला गेल्यावर त्याचा उपयोग प्रथम दुधासाठी आणि मांसासाठी केला गेला असावा. […]

1 25 26 27 28 29 63
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..