वीजनिर्मितीसाठी भारतातील साधन-संपत्ती
आजच आपल्याला विजेचा तुटवडा भासत आहे. विकासाचा नियोजित दर राखायचा तर येत्या दहा वर्षांत भारतातलं विजेचं उत्पादन आजच्या तुलनेत दुप्पट, तर वीस वर्षांत चौपटीहून अधिक होणं गरजेचं आहे. विजेची ही प्रचंड गरज भागवण्यासाठी भविष्यात आपल्याला पारंपरिक पद्धतींचा अधिकाधिक वापर करावा लागणार आहेच, पण त्याबरोबरच पवनऊर्जा, सौरऊर्जा, सागरीऊर्जा यासारख्या आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या अपारंपारिक स्रोतांकडेही विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. […]