तिबेटी साप
तिबेटचं पठार म्हणजे एक आत्यंतिक परिस्थिती असणारं ठिकाण आहे. सुमारे पंचवीस लाख चौरस किलोमीटर इतक्या मोठ्या आकाराच्या या पठाराची सरासरी उंची चार हजार मीटरहून अधिक आहे. इथली हवा अत्यंत विरळ आणि थंड असते. इथलं तापमान हिवाळ्यात शून्याखाली वीस अंश सेल्सिअसच्या खाली जातं. […]