देवमाशांचा माग
देवमासे वर्षभराच्या काळात आपल्या वास्तव्याची जागा बदलत असतात. त्यांच्या वास्तव्याच्या जागेत होणारा हा बदल वेगवेगळ्या कारणांसाठी असू शकतो. काही जातींचे देवमासे हे उन्हाळ्याच्या काळात, जिथे खाद्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं अशा किनाऱ्यापासून दूरच्या ठिकाणी जातात; तर थंडीच्या दिवसात ते प्रजोत्पादनाच्या दृष्टीनं अनुकूल असणाऱ्या किनारी भागात राहतात. […]