प्लॅस्टिकबंदी
सरकारने ठरवले, न्यायालयाने मान्य केले आणि महाराष्ट्रात ‘प्लॅस्टिकबंदी’ लागू झाली. प्लॅस्टिक हाच पर्यावरणाचा सर्वांत मोठा शत्रू आहे आणि या प्लॅस्टिकबंदीमुळे पर्यावरणाचा हास आणि मुक्या जनावरांचा त्रास थांबणार, असे घोषित केले गेले. समुद्रातल्या प्रदूषणाला या बंदीमुळे आळा बसेल अशी खात्री दिली गेली. प्लॅस्टिकला पर्यावरणाचा गुन्हेगार ठरवल्यावर, प्लॅस्टिक वापरत असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना त्या वापराबद्दल कायद्याने चक्क गुन्हेगार ठरवले गेले आणि त्यांच्यावर अतिरेकी दंड लादण्यात आला […]