घरगुती इंधनवायू (एल.पी.जी.)
एल.पी.जी. म्हणजेच ‘लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस’ होय. याचाच अर्थ, द्रवात रूपांतर केलेला वायू होय. हा गॅस प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन या हायड्रोकार्बन रसायनांनी युक्त असतो. […]
विज्ञान / तंत्रज्ञान
एल.पी.जी. म्हणजेच ‘लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस’ होय. याचाच अर्थ, द्रवात रूपांतर केलेला वायू होय. हा गॅस प्रामुख्याने प्रोपेन आणि ब्युटेन या हायड्रोकार्बन रसायनांनी युक्त असतो. […]
पेट्रोलियम खनिज तेलाचा रंग व स्वरूप पाहता, त्याला ‘काळे सोने’ असे संबोधिले जाते. त्याची वाढती गरज लक्षात घेता, वास्तविक ते औद्योगिक क्षेत्राला ‘जीवन देणारे रक्त’ असं म्हटल्यास वावगे न ठरो. फार फार जुन्या काळापासून प्राणी व वनस्पतींच्या जमिनीत गाडल्या गेलेल्या अवशेषातून हायड्रोकार्बन तेले निर्माण झाली व ती जमिनीत तसेच समुद्राच्या तळाशी काळ्या जाडसर तेलाच्या स्वरूपात साचली गेली. […]
मुळात, पेट्रोल रंगहीन असते व पाण्यासारखे दिसते. पण अन्य पेट्रोलियम पदार्थांपासून त्याची सहज ओळख पटावी म्हणून त्यात नारिंगी रंग मिसळला जातो. उच्च ज्वलनक्षमतेच्या पेट्रोलला लाल रंग दिला जातो, तर लष्करात वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट पेट्रोलला निळा रंग असतो. […]
आकाशनिरीक्षणाच्या दृष्टीनं उत्तम आकाश म्हणजे कसं? हजारो ताऱ्यांनी गच्चं भरलेलं… आकाशगंगेच्या पट्ट्याचं सहजपणे दर्शन देणारं… तेजस्वी ताऱ्यांपासून ते अगदी अंधूक ताऱ्यांपर्यंत सर्वांना ‘सामावून’ घेणारं! अर्थात हे वर्णन झालं शहरापासून दूरवरच्या आकाशाचं – जिथे इतर कोणत्याही प्रकाशाचा स्रोत अस्तित्वात नाही, अशा ठिकाणचं. शहरात अर्थात असं आकाश दिसणं शक्यच नाही. […]
विहीर, ओहोळ, नदी, झरे ही पाण्याची महत्त्वाची उगमस्थाने होत. या प्रत्येक उगमस्थानातील पाण्याचे गुणधर्म वेगवेगळे असतात. कठीण, मृदू, खनिजयुक्त पाणी हे पाण्याचे काही रासायनिक गुणधर्म आहेत. पाण्यात साबणाला कमी फेस नाही तर ‘कठीण पाणी’ आणि भरपूर फेस आला तर ‘मृदू पाणी’ होय. […]
डिझेलचे तांत्रिक नाव ‘हाय स्पीड डिझेल’ (एच.एस.डी.) असे आहे व ते रुडॉल्फ डिझेल या जर्मन संशोधकाच्या नावावरून आले आहे. वेगवान वाहनासाठी वापरले जात असल्यामुळे ‘हाय स्पीड’ हे नाव पडले. त्यामुळेच मोटार पंपासारख्या शेतकी कामासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनाच्या तुलनात्मक कमी गतीच्या इंजिनात वेगळ्या डिझेल तेलाचा वापर होतो व त्याला लाइट डिझेल ऑइल (एल.डी.ऑ.) असे संबोधतात. […]
रासायनिक गुणधर्म या दोन शब्दांबरोबर आम्लधर्मी की आम्लारिधर्मी हे गुणधर्म डोळ्यासमोर येतात. कोणत्याही पदार्थातील आम्लधर्म किंवा ओळखण्यासाठी साधी चाचणी असते. या आम्लारिधर्म चाचणीला सामू तपासणे असे म्हणतात. या चाचणीमध्ये कागदाचे खूप बारीक तुकडे करून ते शुद्ध पाण्यात उकळतात. नंतर हे द्रावण गाळतात. […]
सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या रोमन साम्राज्यानं मोठा भूभाग व्यापला होता. या रोमन साम्राज्याच्या खुणा आजही युरोपात भूमध्य सागराजवळच्या देशांत, तसंच उत्तर आफ्रिका आणि पश्चिम आशिआतल्या अनेक भागांत, त्याकाळच्या वैशिष्ट्यपूर्ण बांधकामांच्या स्वरूपात दिसून येतात. […]
गवत, लाकडाचा भुसा, कापडाच्या चिंध्या हे कागद तयार करण्यासाठी लागणारे मुख्य पदार्थ हे तंतुमय असतात. कागद म्हणजे तंतुमय पदार्थांची चटई. कागद तयार करताना तंतूंची भूमिका फार महत्त्वाची असते. गवत, लाकडाचा भुसा, कापडाच्या चिंध्या या पदार्थातील महत्त्वाचा घटक म्हणजे सेल्युलोज. सेल्युलोजमुळे वनस्पती जमिनीवर ताठपणे उभ्या राहू शकतात. […]
नैसर्गिक वायू वीजनिर्मिती, खतेनिर्मिती, स्वयंपाकघरातला गॅस या व अशा प्रकारच्या उपयुक्त कामासाठी वापरता येतो. पण सध्या जगभर हा वायू वाहतूक करणाऱ्या वाहनात मोठ्या प्रमाणात दाबाखाली साठवून वापरला जात आहे. मात्र हा वायू मोठ्या प्रमाणात साठविता येत नाही व त्यामुळे त्याची टाकी वारंवार भरावी लागते. सी.एन.जी हा कोरडा वायू असतो, म्हणजेच त्यात बुटेन व प्रोपेन हे वायू वाजवी प्रमाणात नसतात. हा गॅस मिथेन आणि इथेन व पाच टक्क्यांपेक्षा कमी प्रमाणात प्रोपेन गॅसच्या मिश्रणांनी बनलेला असतो. अगदी अल्प प्रमाणात काही निष्क्रिय वायूदेखील त्यात मिसळलेले असतात. द्रवरूप दिलेल्या नैसर्गिक वायूला एल.एन.जी. (लिक्विफाइड नॅचरल गॅस) संबोधतात […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions