काळे सोने’
पेट्रोलियम खनिज तेलाचा रंग व स्वरूप पाहता, त्याला ‘काळे सोने’ असे संबोधिले जाते. त्याची वाढती गरज लक्षात घेता, वास्तविक ते औद्योगिक क्षेत्राला ‘जीवन देणारे रक्त’ असं म्हटल्यास वावगे न ठरो. फार फार जुन्या काळापासून प्राणी व वनस्पतींच्या जमिनीत गाडल्या गेलेल्या अवशेषातून हायड्रोकार्बन तेले निर्माण झाली व ती जमिनीत तसेच समुद्राच्या तळाशी काळ्या जाडसर तेलाच्या स्वरूपात साचली गेली. […]