ग्रीज आणि भेद्यक्षमता
फिरत्या यंत्रावरील द्रवरूप वंगण घरंगळून खाली जाते, म्हणून त्यासाठी घन स्वरूपातील वंगणे वापरली जातात. या घनस्वरूपातील वंगणांना ‘ग्रीज’ म्हणतात. Greasing the palm (मस्का लावणे) अशा अर्थाची एक इंग्रजी म्हणदेखील आहे. ग्रीज हे पेट्रोलियम बेस ऑइल (प्राथमिक स्वरूपाचे, निर्वात उर्ध्वपातनानेn मिळालेले वंगणतेल) आणि विविध प्रकारचे साबण यांचे मिश्रण होय. हे साबण गरजेनुसार कॅल्शियम, लिथियम, सोडियम, बेरियम, ॲल्युमिनियम, […]