हिप्पार्कसचं आकाश
इ.स.पूर्व दुसऱ्या शतकात होऊन गेलेला हिप्पार्कस हा, ग्रीक राजवटीच्या काळातील एक आघाडीचा खगोलज्ञ होता. हिप्पार्कसनं चंद्र-सूर्याच्या, आकाशाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या भ्रमणाचं गणित अचूकरीत्या मांडलं. पृथ्वीचा अक्ष हा स्थिर नसून तो अंतराळात भोवऱ्यासारखा फिरत असल्याचा शोध हिप्पार्कसनंच लावला. […]