महाकपीचा शेवट
कपी हा वानरवर्गीय प्राण्यांचा एक गट आहे. या प्राण्यांची शारीरिक रचना इतर वानरवर्गीय प्राण्यांपेक्षा अनेक बाबतीत वेगळी असते. त्यांच्यातला सहजपणे लक्षात येणारा फरक म्हणजे कपींना शेपूट नसतं. आजच्या गिब्बन, चिम्पांझी, गोरिला, ओरांगउटान, तसंच मानव, या सर्वांचा या गटात समावेश होतो. […]