हिमयुगातलं तापमान
गेलं हिमयुग हे सुमारे एक लाख वर्षांपूर्वी सुरू झालं आणि बारा हजार वर्षांपूर्वी संपुष्टात आलं. या हिमयुगाची कमाल शीतावस्था वीस-एकवीस हजार वर्षांपूर्वी होऊन गेल्याचं, विविध पुराव्यांद्वारे दिसून आलं आहे. या कमाल शीतावस्थेच्या काळात पृथ्वीच्या पृष्ठभागावरचं सरासरी तापमान हे, आजच्या सुमारे पंधरा अंश सेल्सिअस या सरासरी तापमानापेक्षा सुमारे सात अंश सेल्सिअसनं कमी होतं. पृथ्वीवरचं त्याकाळातलं पृष्ठभागावरचं तापमान […]