नवीन लेखन...

विज्ञान / तंत्रज्ञान

क्रिप्टोग्राफी

या तुम्ही अमुक एका व्यक्तीला अमुक एवढे पैसे द्या असे लिहिलेला संदेश असतो व इतरही माहिती असते. ही माहिती ही केवळ तुम्ही आणि ती व्यक्ती यांच्या पुरतीच मर्यादित राहते. इतरांना ते कळत नाही. हे गणितावर आधारित असं तंत्रज्ञान आहे, त्यालाच एनक्रिप्शन किंवा क्रिप्टोग्राफी असे म्हणतात. […]

विषारी पत्रे

पोस्टातून विशिष्ट व्यक्तीला विषारी पत्र पाठवायची अतिरेक्यांची शक्कल तशी काही नवी नाही, परंतु ते विष जैवरासायनिक स्वरूपातले ‘रिसिन’ असेल, तर त्या ‘विषप्रयोगा’चे गंभीर परिणाम होऊ शकतात. […]

फोन टॅपिंग

कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन कसा मारला गेला, बटला हाऊस एनकाउंटर का घडू शकले, उत्तर प्रदेशातील गुंड श्रीप्रकाश शुक्ला याला मारण्यात यश कसे मिळाले या तीनही प्रश्नांचे उत्तर एकच आहे ते म्हणजे फोन टॅपिंगमुळे हे शक्य झाले. दिल्लीत किमान सहा हजार लोकांचे फोन टॅप होतात, तर महानगरांमध्ये १० ते २० फोन गुप्तचरांच्या किंवा पोलिसांच्या नजरेखाली असतात असे आता स्पष्ट झाले आहे. […]

पेसमेकर

हृदयाच्या ठोक्यांची गती नियमीत करणे हे पेसमेकरचे कार्य असते. आधुनिक पेसमेकरचे बाहेरुन प्रोग्रॅमिंग करता येते. अशा काही यंत्रांमध्ये पेसमेकर व डिफायब्रिलेटर यांचा समन्वय असतो. हृदयाच्या खालच्या चेंबरचे कार्य सुधारण्यासाठी जास्त इलेक्ट्रोडच्या पेसमेकरचा वापर केला जातो. […]

ब्रेन मॅपिंग

एखाद्या आरोपीने गुन्हा केल्यानंतर त्याच्या मनात अपराधीपणाची भावना असते, तिचा शोध मेंदूच्या आरेखनातून घेण्याचा प्रयत्न ब्रेन मॅपिंग चाचणीत केला जातो. या चाचणीला पी-३०० असेही म्हणतात. […]

लाय डिटेक्टर

लाय डिटेक्टर हे असत्यशोधक यंत्र असते. जेव्हा एखादा माणूस खोटे बोलत असतो, तेव्हा त्याचे हृदय धडधडते किंवा त्याला श्वास लागतो. हे सगळे नकळत घडत जाते. शरीरातील हे बदल यंत्राच्या मदतीने टिपले जातात व त्यातून ती व्यक्ती खोटे बोलत आहे हे समजते. या यंत्राला पॉलीग्राफ असेही म्हटले जाते. […]

ऐतिहासिक पाऊस !

१४ ऑगस्ट २०२१ रोजी ग्रीनलँडच्या बर्फाच्या शीटवर पडणाऱ्या पावसाच्या अहवालाने जागतिक मथळे बनवले तेव्हा जगभरातील शास्त्रज्ञांना धक्का बसला. ऐतिहासिक घटना अलीकडील इतिहासातील पहिली घटना होती आणि त्यानंतर पृष्ठभागावरील बर्फ वेगाने वितळत होता. संशोधकांनी आता या घटनेचे विश्लेषण केले आहे आणि उघड केले आहे की वर्षाच्या एका वेळी जेव्हा हंगामी वितळणे कमी होत असते तेव्हा उष्णतेच्या लाटेपूर्वी पाऊस पडला होता. […]

ब्लड प्रेशर मॉनिटर

ॲ‍नरॉईड प्रकारची उपकरणे ही एकट्याला वापरणे अवघड असल्याने तसेच त्यात वारंवार रीडिंगचे सेटिंग करावे लागते. त्यामुळे डिजिटल स्फिग्मोमॅनोमीटर वापरणे अधिक योग्य असते. त्यात एक धाग्यांची बनवलेली पट्टी असते त्याला एलसीडी पॅनेल जोडलेले असते. रक्तदाब मोजताना ती पट्टी हाताच्या दंडाजवळ गुंडाळली जाते व नंतर एक आवाज येतो, तो इलेक्ट्रिक मोटरचा असतो. छोट्याशा पंपाने ती पट्टी फुगवली जाते व नंतर हवा सोडलीही जाते. त्यातून सिस्टीलिक व डायस्टॉलिक हे रक्तदाबाचे आकडे एलसीडी पडद्यावर दिसतात. […]

डिजिटल थर्मोमीटर

घरात कोणाला ताप आला की आपण चटकन थर्मोमीटर तोंडात किंवा काखेत ठेवून ताप मोजतो अतिशय उपयुक्त असे हे साधन आहे. थर्मोमीटर इतिहास तसा फार जुना आहे. १५९३ मध्ये खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ गॅलिली  याने पहिला थर्मोमीटर  तयार केला होता, त्याला त्यावेळी धर्म थर्मोस्कोप असे नाव  होते. तो फार अचूक नव्हता.  अचूक असा थर्मोमीटर १६४१ मध्ये तयार झाला. […]

नाईलचा बाहू

नाईल नदीच्या खुफू ‘बाहू’नं गिझाच्या पठारावरील पिरॅमिडच्या बांधणीत मोठी भूमिका बजावली असली तरी, या अगोदरच नाईल नदीची पातळी खाली जायला सुरुवात झाली असल्याचं या संशोधकांना आढळलं. कारण आफ्रिकेतला अतिदमट हवामानाचा काळ संपला होता. नाईल नदीला पूर्व आफ्रिकेतून होणारा पाणीपुरवठा रोडावला होता. मात्र नाईल नदीची पातळी आता जरी घटू लागली असली तरीही, खुफू शाखेला पाणी पुरवण्याइतकी ती पुरेशी होती. पिरॅमिड बांधली गेली त्या शतकात, खुफू शाखेची पातळी एकेकाळच्या कमाल पातळीच्या तुलनेत चाळीस टक्क्यांवर स्थिरावली होती. […]

1 39 40 41 42 43 63
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..