टुटानखामूनचा खंजीर
इजिप्तविषयक एका पुरातन लिखाणात असा उल्लेख आहे की, मितान्नी या (आजच्या सिरिआत असणाऱ्या) राज्याच्या राजाकडून, सोन्याची मूठ असलेला एक लोखंडी खंजीर टुटानखामूनच्या आजोबांना भेट दिला गेला होता. कदाचित हाच तो खंजीर असल्याची शक्यता ताकाफुमी मात्सुई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या या संशोधनात व्यक्त केली आहे. ताकाफुमी मात्सुई आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं टुटानखामूनच्या खंजिरावरचं हे सर्व संशोधन, ’मिटिऑरिटिक्स अँड प्लॅनेटरी सायन्स’ या शोधपत्रिकेत नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. […]