आशियाचं प्रवेशद्वार
आफ्रिकेतून आशियात जाण्यासाठी माणसानं कुठला मार्ग वापरला असावा, हा मानवी उत्क्रांतीच्या दृष्टीनं पूर्वीपासून कुतूहलाचा विषय ठरला आहे. तो अरेबिआतून आशियात शिरला असण्याची शक्यता खूपच आहे. मात्र त्यानं अरेबिआ नक्की कुठून पार केला, याबद्दल संशोधकांत एकमत नाही. काही संशोधकांच्या मते तो खालच्या बाजूनं – दक्षिण अरेबिआतून – तांबड्या समुद्रामार्गे आशियात शिरला असावा; तर काही संशोधकांच्या मते, तो […]