तंत्रविश्व – भाग ६ : उत्पन्नाचा ऑनलाइन मार्ग शोधताना..
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बहुतांश व्यक्तींना आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी अर्थप्राप्तीच्या पर्यायी मार्गाचाही शोध घेतला जात आहे. जिओमुळे स्वस्त झालेल्या इंटरनेटचा वापर मनोरंजनाबरोबरच माहिती,ऑनलाईन उत्पन्न मिळविण्यासाठी म्हणजेच online earningकरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातोय.त्यासंबंधीचे आकर्षक थंबनेल असलेले युट्यूब व्हिडिओ पाहून अनेकांच्या मनात गैरसमज व अवास्तव अपेक्षा देखील निर्माण झाल्या आहेत.अशावेळी ऑनलाईन उत्पन्नाचे मार्ग, पद्धती योग्यरीत्या समजून न घेता त्या गोष्टी करावयास गेल्याने निराशाच पदरी पडते. अशावेळी तुम्ही ऑनलाईन उत्पन्नाचे पर्याय शोधत असाल तर काही बाबी लक्षात ठेवणे तुमच्या गरजेचे असेल. […]