कुटुंब समृद्धी बाग
आपल्याकडच्या बहुसंख्य शेतकऱ्यांचं उत्पन्न जेमतेम कसंबसं जगण्याइतकंच असतं. त्यातच अलीकडे वाढलेले उत्पादन खर्च, शेतमालाला मिळणारे कमी भाव, यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचलेली दिसते. साहजिकच शेतकरी व त्याच्या कुटुंबीयांना आधुनिक आहारपद्धतीत तज्ज्ञांनी शिफारस केलेले अन्नघटक तसेच पोषणमूल्येही मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी कुटुंबांत कुपोषण वाढून त्यांचे आरोग्यमान दिवसेंदिवस ढासळत चालले आहे. […]