“क्रमश:” या नव्या सदराद्वारे काही मराठी पुस्तके “मराठीसृष्टी”द्वारे वाचकांपर्यंत पोचवण्याचा हा एक प्रयत्न. आतापर्यंतच्या “मराठीसृष्टी”च्या अनेक उपक्रमांना प्रतिसाद आणि दाद देणार्या आमच्या वाचकांना हा प्रयत्न नक्कीच आवडेल…
त्या दिवशी रिसेप्शन वरून परतायला उशीर होईल म्हणून ते गाडीवरूनच गेले होते. येताना त्यांच्या अंदाजापेक्षा जरा जास्तच उशीर झाला. रात्री घरी उशिरा पोहोचलो तर झोपायला उशीर होईल आणि सकाळी उठायला उशीर झाला तर कामावर जायला उशीर होतील या विचाराने रात्रीचे ११ वाजलेले असताना देखील त्यांनी या रस्त्याने घरी जाण्याचा निर्णय घेतला. […]
ती दोघं आता त्या चढाच्या वळणावर पोहोचली होती…. तेवढ्यात त्यांना परत एका चारचाकी गाडीचा उजेड दिसला….. आता मात्र दोघंही त्यांचे हात हलवत मोठमोठ्यांदा हेल्प, हेल्प म्हणत रस्त्याच्या थोडे पुढे आले….. […]
ते दोघं एकमेकांशी गप्पा मारत थोडावेळ चालत राहिले… खरोखरच रोहनची साथ मिळाल्यामुळं हा अवघड रस्ता पार करणं सोपं होवून गेलंय असं नीशाच्या मनात आलं. मघासची आंधाराची आणि एकटेपणाची भीती नीशाच्या मनातून पार हद्दपार झाली होती… आणि क्षणात तिचं मन एका अनोख्या सुगंधानं भारलं गेलं. […]
“डोन्ट वरी बेबी. सगळं ठीक होईल. आता मी आहे ना तुझ्या सोबत? चल आपण पटपट जाऊया चौकीपर्यंत. मीनव्हाईल जर माझ्या मोबाईलला रेंज आलीच तर आपण यावरून कॉल करू… ओके?” दोघंही गप्पा मारत चौकीच्या दिशेनं चालू लागले…. […]
आपल्याच नादात ती काही वेळ चालत राहिली आणि तिच्यापासून काही फर्लांगभर अंतरावर, ओढ्यावर जो पुल होता, त्या पुलाच्या टोकाशी काहीतरी हालचाल होत असल्याचं तिला जाणवलं….. परत निशाच्या मनात चऽऽऽऽर्र झालं. बापरे… आता हे काय नवीन संकट??….. […]
ते आवाज आता वजनदार आणि जास्त जोरात येवू लागले…. पालापाचोळ्यावरील त्या आवाजांचा वेग तिला जाणवू लागला…. सगळं बळ एकवटून, मनाचा हिय्या करून ती येणार्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी, येणार्या आवाजांचा कानोसा घेत सावधपणे त्या दिशेने पाहू लागली आणि ….. […]
तिची गाडी गचके खात, थोडी वेडीवाकडी होत थांबली. त्या थंडीतसुद्धा निशाला चांगलाच घाम फुटला. ‘आधीच उल्हास नी त्यात फाल्गुन मास’ अशी अवस्था झाली. तिनं गाडी थोडी रस्त्याच्या कडेला घेतली आणि मोबाईलच्या उजेडात ती गाडीला काय झालं ते पाहू लागली. […]
भाग एक निशा, 22 वर्षाची, गहूवर्णाची, कुरळ्या केसांची, रेखीव बांधा, हसरा चेहेरा, डोळ्यावर चष्मा असलेली, थोडीशी मितभाषी मुलगी, घरातून बाहेर पडण्यासाठी आवरत होती. तिनं लाल रंगाचा टॉप, निळ्या रंगाची जीन्स घातली होती. त्यावर लेमन कलरचा, फुलांची सुंदर प्रिंट असलेला मोठ्ठा स्टोल घेतला होता. तिची सॅक तिनं पाठीवर अडकवली होती. तिच्या स्कूटरची चावी तिला मिळत नव्हती त्यामुळे […]
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्याच्या होमकुंडात होरपळून निघाले होते. नातेवाईक, सगेसोयरे, अगदी जवळच्या लोकांनी सुद्धा त्यांना दूर लोटले होते. सरकारी ससेमिरा मागे लागल्यावर तर लोकांनी त्याच्याकडे जाणेयेणे, बोलणे टाळले होते. क्रांतीवीर गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर हे स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू. […]
अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले.कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले. […]