“क्रमश:” या नव्या सदराद्वारे काही मराठी पुस्तके “मराठीसृष्टी”द्वारे वाचकांपर्यंत पोचवण्याचा हा एक प्रयत्न. आतापर्यंतच्या “मराठीसृष्टी”च्या अनेक उपक्रमांना प्रतिसाद आणि दाद देणार्या आमच्या वाचकांना हा प्रयत्न नक्कीच आवडेल…
दुटांगी पांढरधोतर , वर पांढरा सदरा , डोक्यावर पांढरी /काळी कोणतीतरी टोपी , अन बगलेत धरलेली आडवी छत्री या खेरीज दत्ताकाकाला इतर पोशाखात पाहिल्याचे मला स्मरत नाही .दत्ताकाका माझ्या वडिलांचा दूरचा भाऊ . वडिलांपेक्षा सहा-सात वर्षांनी लहान . त्याचे आई वडील प्लेगात गेले . जाताना ‘ रंगनाथा, आमच्या दत्ताला अंतर देऊ नकोस ‘ असे वचन घेतले होते म्हणे . ते आमच्या वडिलांनी म्हणजे अण्णांनी मरे पर्यंत पाळले . अगदी पाठच्या भावा प्रमाणे मानले आणि वागवले सुद्धा ! तो हि अगदी सख्या भावा सारखाच वागला ! […]
तो कोणाचा कोण होता माहित नाही पण माझा मात्र बंडूदादाच होता! त्याच्यात माझ्यात सहासात वर्षाचे अंतर होते . तेव्हा मी सात आठ वर्षांचा असेल . पण वय कधीच त्याच्या माझ्यात आड आले नाही . मी लहान म्हणून त्याने कधी दुय्यमतेने वागवले नाही कि, तो मोठा म्हणून अंतर ठेवले नाही . तो एक ‘ब्राह्मणाचे अनाथ पोर ‘ हि माहिती नन्तर मिळाली पण ती गौण होती आणि गौणच राहिली . आमच्या घरातहि त्याच्यात माझ्यात कधीच भेदभाव झाला नाही . […]
या ‘कंगाल ‘ वाटणाऱ्या माणसांनी माझ्या झोळीत काही ना काही टाकलय , मला ‘श्रीमंत ‘ केलाय ! ती आहेत तशी स्वीकारलीत तर ‘माझी माणसं ‘ ‘आपली माणसं ‘ होतील ! आज पासून त्यातील काहींची ओळख करून देणार आहे . आज माझ्या काही मित्रांचे ‘नमुने ‘ एन्जॉय करा . […]
भाग – ५ आधुनिक काळात पारंपरिक आरत्या लिहिल्या जातातच, पण इतरही अनेक, भिन्नभिन्न वर्ण्यविषयांवर रचल्या जातात. जसें, शिवरायांसारख्या महापुरुषांवर, ( जसें ‘आरती शिवराया’, ही मी लिहिलेली आरती ). हल्ली, ज्यांना VIPs म्हणतात, अशा व्यक्तींवरही आरत्या लिहिल्या जातात. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकुर (टागोर) यांचें ‘जनगणमन’ ही एकप्रकारें आरतीच आहे. तें मूळ काव्य तत्कालीन ब्रिटिश राजपुत्र पंचम जॉर्ज याच्या […]
भाग – ४ अवतारकल्पना हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. त्याचें प्रतिबिंब आरत्यांमध्येही दिसतें. ‘दशावतारांची आरती’ तर आपल्याला दिसतेच, पण इतर आरत्यांमध्येही अवतारांचा उल्लेख येतो. ज्ञानदेवांच्या आरतीत ‘अवतार पांडुरंग’ असा उल्लेख आहे, तसाच तो नामदेवांच्या आरतीतही आहे (‘पांडुरंगे अवतार’). रामदासांच्या आरतीत, शंकर-मारुती-रामदास असा अवतारांचा उल्लेख आहे, ‘साक्षात शंकराचा अवतार मारुती । कलिमाजी तेचि जाली । […]
भाग – ३ आपण आरतीची कांहीं वैशिष्ट्यें पाहूं या. आरतीत आराध्य/उपास्य दैवताचें वर्णन असतें, जसें गणपतीच्या आरतीत, रत्नखचित फरा, चंदनाची उटी, हिरेजडित मुकुट, पायीं घागर्या, पीतांबर, इत्यादी वर्णन केलेलें आहे ; शंकराच्या आरतीत, विषें कंठ काळा, त्रिनेत्री ज्वाळा, व्याघ्रांबर, वगैरे वर्णन आहे ; विठ्ठलाच्या आरतीत, पीतांबर, तुलसीमाळा, कटीवर हात, इत्यादी वर्णन आहे . आराध्य/उपास्य हें ‘संत’ […]
भाग – २ अर्चनेचे प्रकार आपल्याला वैदिक काळापासून दिसून येतात. वैदिक ऋचांमध्ये वेगवेगळ्या देवतांना वंदन व त्यांची स्तुती केकेली आहे. उदाहरणार्थ,अनेकांना परिचित असलेला गायत्री मंत्र. ‘ॐ तत्सवितुर्वरेण्यम्’ हा गायत्री मंत्र, सूर्याची वंदना करणारा मंत्र आहे. इंद्र, मित्र-वरुण, नासत्य (अश्विनीकुमार) यांची अर्चना होत असे, हें आपण आधी पाहिलेंच आहे. तसेंच, उषा, सरस्वती नदी यांची स्तुती करणार्या वैदिक […]
भारत हा उत्सवप्रिय, सणप्रिय देश आहे. भारतात सण भरपूऽर , आणि, सण म्हटलें की, पूजा-अर्चा-आरत्या आल्याच ! त्यातील ‘आरती’ या विषयावर कांहीं ऊहापोह करावा म्हणून हा लेख. भाग – १ भारतातीलच काय , पण सर्व जगातील बरेच लोक ‘अस्तिक’ आहेत. ‘अस्ति’ म्हणजे, ‘(तो/ती/ तें) अस्तित्वात आहे’ . अति-पुरातन काळीं, ‘अस्तिक’ या शब्दाचा अर्थ ‘वेदांना मानणारा’ असा […]
“क्रमश:” या नव्या सदराद्वारे काही मराठी पुस्तके “मराठीसृष्टी”द्वारे वाचकांपर्यंत पोचवण्याच्या या प्रयत्नातील हे पहिले पुस्तक….. “गावाकडची अमेरिका”. आतापर्यंतच्या “मराठीसृष्टी”च्या अनेक उपक्रमांना प्रतिसाद आणि दाद देणार्या आमच्या वाचकांना हा प्रयत्न नक्कीच आवडेल… “मराठीसृष्टी”च्या माध्यमातून “गावाकडची अमेरिका” हे एका अत्यंत वेगळ्या विषयावरील पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकाचे इ-बुक सुद्धा प्रकाशित केले. हे पुस्तक आता वेबसाईटवर “क्रमश:” च्या […]