‘उलाढाल’ या चित्रपटासाठी संगीतकार अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेले आणि जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेले हे गाणे जबरदस्त हीट झाले आहे. विविध वाहिन्यांवरील संगीत स्पर्धेत सहभागी स्पर्धकांकडून तसेच गणपती विसर्जन मिरवणुकीतही ते हमखास गायले आणि वाजवले जाते. हे गाणे स्वतः अजय गोगावले यांनी गायले असून अजय-अतुल यांच्या खास शैलीमुळे गाण्याला एक वेगळेच परिमाण मिळाले. […]
चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणेश देवतेचे आपल्या लेखणीद्वारे अनेकांनी गुणगान केले आहे. कवी, गीतकार, शाहीर यांच्यासह महाराष्ट्रातील संतांनीही आपल्या अभंगातून आणि काव्यातून गणपतीचे वर्णन केले आहे. […]
नुकतेच टीव्हीवर पाण्यावरचा तरंगता दगड कुंभमेळा दरम्यान दाखवला होता. अनेक जण त्याला पाया पडताना दाखवले जात होते. कोणीही वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून घेऊन थांबत नव्हतें, थांबणार नाहीत.अध्यात्मासमोर कधीकधी विज्ञानही हतबल होतं. कोणताच हेतू नसलेले, कोणता तरी हेतू असलेले तर काही जण केवळ बघे म्हणून यात सामील होतात. […]
तमाशातील गण गौळण किंवा वगामधील नमन असो, येथेही गणपतीचे स्तवन आणि गुणगान केलेले पहायला मिळते. शाहीर साबळे यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमात सादर होणारे ‘पयलं नमन, आम्ही करितो वंदन’ हे सगळ्यांना परिचित असून यात गणपतीला रंगमंचावर नृत्य करतानाही दाखवले आहे. […]
अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि मुमुक्षूंचे आश्रयस्थान आहे. श्रीस्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वांत मोठी लीला आहे. अशी लीला आणि असा चमत्कार प्रत्यक्ष भगवंतालाही पुन्हा कधी जमेल असे वाटत नाही! स्वामी समर्थांना समाधिस्थ होऊन आज शंभराहून अधिक वर्षे उलटून गेली. परंतु त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतच आहे. […]
मराठी किंवा हिंदी चित्रपट संगीतात अनेक संगीतकारांनी लोकसंगीताचा वापर मोठ्या कल्पकतेने करून घेतला आहे. ज्या संगीतकारांनी चित्रपटातील गाण्यांना लोकसंगीतातील ठेका किंवा संगीत वापरले ती गाणी अमाप लोकप्रिय झाली. […]
प्रभु श्री राम वनवासात असताना या ठिकाणी काही काळ वास्तव्यास होते. त्यामुळे या ठिकाणाला रामटेक हे नाव ठेवले गेले. नागपूरपासून ५५ कि.मी. वर असलेले हे शहर अतिशय सुबक आहे. शहराच्या पूर्वेला एक उंच डोंगर आहे त्यावर प्रभू श्रीरामांचे सुमारे ६०० वर्षे जुने मंदिर आहे. […]
आंजर्ले हे गाव दापोली तालुक्यात (जि. रत्नागिरी) समुद्रकिनारी वसले आहे. गावाला जोडणारी वाहतूक व्यवस्था परिपूर्ण असून आंजर्ले – वेसवी – मंडणगड-मुंबई त्याचप्रमाणे आंजर्ले – दापोली व तेथून मुंबई- पुणे, कोल्हापूर, रत्नागिरी असे रस्ते आहेत. […]
श्रीपाद श्रीवल्लभ, श्रीनृसिंहसरस्वती यांच्यानंतर दत्तात्रेयाचे तृतीय पुर्णावतार म्हणून श्रीमाणिकप्रभूंचेच नाव घ्यावे लागेल. लिंगायत धर्माचे संस्थापक बसवेश्वर यांनी श्रीमाणिकप्रभूंच्या अवताराचे भाकीत बरेच दिवस आधी वर्तवले होते. श्रीमाणिकप्रभूंचे सारेच चरित्र अतर्क्य व अद्भुत घटनांनी भरलेले आहे. त्यांची अलोट संपत्ती, अतुल ऐश्वर्य, त्यांनी केलेले अमाप अन्नसंतर्पण इत्यादी लोकोत्तर गोष्टी वाचून वाचक खरोखरच स्तिमित होतो! […]
गणपती, त्याची भक्ती, महिमा यावर आधारित ‘अष्टविनायक’ हा मराठी चित्रपट आजही आपली लोकप्रियता टिकवून आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्या ना कोणत्या वाहिनीवर हा चित्रपट दरवर्षी एकदा तरी दाखवला जातोच. […]