जय देवा जय देवा जय मोहिनी देवा शरण आलो तुजला सुखी मजसी ठेवा ।। समुद्र मंथन करुनी चौदा रत्ने काढिली सर्व देवांना ती तु अर्पण केली । अम्रुत वाटप करता तंटा बहू झाला वाटप करणेसाठी मोहीनी रुपे तु आला ।। रुप बदलून राहू देवासह आला नजर चुकऊनी अम्रुत प्राशु लागला नजरेतुन तुझ्या तो नाही […]
अक्कलकोट निवासी जगद्गुरू परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र हे सर्वांग सुदंर आहे. स्वामींच्या चरित्राचे पठण केल्याने साधा भोळा प्रांपचिक भक्त ते हटयोगी साधकापर्यंत सर्वांना हवे ते प्राप्त होते. दु:खित, पिडीत, मुमुक्षू जिवांना आधार देऊन दु:ख मुक्त करणारे दीनजनउध्दारक स्वामी महाराज हे केवळ शुध्द भक्तीभाव आणि निर्मळ मनाने केलेल्या अल्प साधनेने ही अतिप्रसन्न होतात. […]
ज्ञानेश्वरांना माणूस फार अचूक कळला होता. या माणसाला जगवण्यासाठी काय ज्ञान द्यावे लागेल हे त्यांना फार चांगले उमगले होते. यामुळेच त्यांनी वेदांमधून कडसून काढलेल्या भगवदगीतेचा भावार्थ सांगायचे ठरवले असावे. तो भावार्थ असावा, अनुवाद नसावा हा त्यांच्या प्रज्ञाचक्षुंचा दूरगामी निर्णय. […]
तुम्ही भलेही कट्टर ‘नास्तिक ‘ असाल , तरी तुम्हास एक विनंती आहे ,हे स्तोत्र (केवळ १०८ ओव्यांचे आहे . तुमचा फारसा वेळ घेणारे नाही ) किमान एकदा तरी वाचा , एक साहित्यिक प्रकार म्हणून किंवा एक चारोळ्याचा संग्रह म्हणून . तुम्ही एका वाचनात ‘आस्तिक ‘ होणार नाहीत ,पण वाचनातून मिळालेला आनंद अप्रतिम असेल याची खात्री मी देतो . […]
अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शिर्डीचे साईबाबा, शेगावचे गजानन महाराज, कणकवलीचे भालचंद्र महाराज किंवा नागडेबाबा इत्यादी कोणत्याही अवतारांबाबत माझा सखोल असा अभ्यास नसला, तरी एक निरीक्षण आहे आणि ते माझ्यापुरतं खरं आहे हे मला पटलेलं आहे. अर्थात, माझं मत आपल्याला मान्य असायलाच हवं, असा काही माझा आग्रह नाही. मला या अवतारी पुरुषांबद्दल काय वाटतं ते मी या लेखात मांडायचा प्रत्न केला आहे. या लेखातून कोणाच्या भावना दुखावाव्यात असा माझा हेतू नाही. […]
आम्हाला सांगण्यात आले कि राम वनवासातून आयोध्येत याच दिवशी परत आले म्हणून आपण गुढ्या तोरणे उभारतो. पण निषिद्ध असलेल्या बांबूवर ,कडू लिंबाचा पाला लावून ,पालथा तांब्या हे सर्व अशुभ एकत्रित करून “गुढी उभारली जाते हा काय आनंदोत्सव आहे ? खुद्द आयोध्येत अथवा उत्तरेकडील कुठल्याही राज्यात अशी गुढी उभारली जात नाही . […]
आपल्या विश्वाची उत्पत्ती एका शक्तिशाली महाविस्फोटातून झाल्याचा वैज्ञानिक सिद्धांत आहे .हि शक्ती विश्वनिर्मितीच्या पूर्वी पासून अस्तित्वात आहे . म्हणून तिला आदिशक्ती म्हणतात . ती चराचरात सामावलेली आहे यात दुमत असण्याचे कारण नाही . आदिमानवपासून ते आजच्या प्रगत मानावा पर्यंत या शक्तीस या ना त्या रूपात पुजणारे लोक (आस्तिक ,नास्तिक )आहेत . कोल्हापूरची महालक्ष्मी असो , वणीची देवी असो वा तुळजाभवानी असो कि काली ,अनेक भक्त आहेत. अनेकांच्या या ‘देवी ‘ कुलदैवता आहेत . […]
गणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात. या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस आणि तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस ! […]