( अर्थात वटपौर्णिमा व्रत ) स्त्री जातीचा मुकुटमणीं महासती मान मिळोनी धन्य झाली जीवनीं पतीव्रता सावित्री //१// ब्रह्मा लिखित अटळ ह्या सूत्रीं केला बदल हे तिच्या तपाचे फळ सावित्रीने मिळविले //२// जरी येतां काळ चुकवावी वेळ बदलेल फळ हेच दाखविले तीने //३// समजण्या धर्म पतिव्रता ऐकावी सावित्री कथा मनीं भाव भरुनी येतां आदर वाटे तिच्या परीं //४// […]
(श्री भक्त पुंडलीक कथा) श्री विठ्ठलाचे चरणीं विनम्र होऊनी दर्शन घेई मागुनी मी तुझा भक्त १ पुंडलीकास देई दर्शन नसूनी भक्ती तव चरण सेवा माता-पित्यांची करुनी तुजसी पावन केले २ सेवा आई-वडीलांची करीसी परी प्रभू पावन झालासी ही भक्तिची रित कैसी समज न येई कुणा ३ तपाचे मार्ग वेगवेगळे सर्व प्रभू चरणी मिळे हे कुणास न […]
देव्हाऱ्यातील देव अनेक शंख तयांमध्ये एक महत्त्व त्याचे जाणोनी ठीक सकलजन हो ।। १।। हिंदूची दैवते अनेक रूपे देवांची कित्येक इष्ट देवता पूजितो प्रत्येक सर्व देवांमध्ये ।।२।। देव्हाऱ्यातील देवांत शंखघंटा असावी त्यांत प्रथा पूजेची असण्यात हिंदूच्या ।।३।। शंखास पूजेतील मान प्राप्त होई ‘वर’ मिळोन कथा त्याची जाणून घ्यावी तुम्ही ।। ४।। सांदिपनी ऋषीच्या आश्रम शिष्यगण करिती […]
तुलसीचे झाड अंगणीं । सर्वांच्या घरातुनी ।। त्याचे महत्त्व जाणूनी । गृहलक्ष्मीसाठीं ।।१।। पवित्रता धर्म एक । घर गृहस्थीचे सुख ।। पवित्रतेचे प्रतीक । तुलसी असे ।।२।। तुलसीचे झाडास । परमेश्वराचा सहवास ।। गृहसुख त्या घरास । लाभत असे ।।३।। तुलसी झाडास मोठेपणा । मिळत असे ‘वर’ मिळोन ।। कथा ऐकवी चित्त देवून । सकळ जन […]
वंदन तुज मारुतीराया तुझा आशीर्वाद मिळाया न कळे कुणास तुझी माया भक्ताविना ||१|| रुद्राचे तू रुप असता शक्तीची तू देवता अचाट कामे क्षणांत ह्या पृथ्वीवरी ||२|| शक्ती बुद्धी नि सेवा ह्याचा तूं मुर्तीमंत ठेवा भक्तीभाव मनीं यावा हीच माझी इच्छा ||३|| शक्तीचे तूं दैवत बुद्धीदाता तूं होत शक्ती नि बुद्धी एकांत मिळे तुझ्या आशिर्वादे ||४|| हनुमंताची […]
श्रीरामाचा अवतार दुष्टांचा करण्या संहार जन्म घेतला पृथ्वीवर परमेश्वरानी ||१|| रामासी लाभले मोठेपण तयाठायीं तन मन धन अर्पिती सर्व भक्तजन प्रेमभरे ||२|| थोर ग्रंथ रामायण त्यातील जन्मकथा निवडून करीत असे अर्पण तुमचेसाठीं ||३|| लंकाधीपती रावण होता शिवभक्त महान उन्मत्त झाला वर पावून त्रास देई सर्वाना ||४|| युद्ध केले स्वर्गासी बंदी केले देवांसी छळूं लागला […]
ब्रह्मा विष्णु महेश तीन रुपें एक अंश विश्वाचे तुम्हीं ईश दत्तात्रय रुपांत ।।१।। उत्पत्ति स्थिति लय तीन कार्ये होत जाय विश्वाचा हा खेळ होय तुझ्या आज्ञेने ।।२।। तीन देवांचे रुप निराळे एकत्र होती सगळे दत्तात्रय होऊन अवतरले ह्या जगती ।।३।। दत्त जन्मकथा आनंद होई वदता ग्रहण करावे एकचिता सकळजण हो ।।४।। तिन्ही लोक फिरुनी नारद आले […]