श्री गणेशा नमुनी तुला नंतर नमितो कुलस्वामिनीला मातापूरवासिनी रेणूकेला कृपा प्रसादे ।१। तुझा महिमा असे थोर दुःख नष्ट होती सत्वर कृपा करिसी ज्याचेवर पावन होत असे ।२। गणेश जन्मकथा सांगतो तयाचा महिमा वर्णितो आनंदीभाव समर्पितो तुम्हासाठी ।३। सर्व दुःखे दुर कराया तुम्हांसी सुखे द्यावया जन्म घेती गणराया तुम्हां करिता ।४। असतील देव अनेक देवाधीदेव महादेव एक […]
गायत्री मंत्राचा जप करताना जीभ आणि ओठदेखील न हलवता मनातल्या मनात करायचा आहे असे शास्त्र सांगत असताना बॉलिवूड गाण्याच्या धर्तीवर तो मंत्र लावून आपण काय साध्य करतो बरं? […]
गुरु आणि सदगुरु यातील भेद न समजल्यामुळे परमार्थात अनेक चांगले साधक वाया जातात असे दिसून येते. विद्यागुरु , कलागुरु , मंत्रगुरु आणि मोक्षगुरु असे गुरुंचे स्थुलमनाने चार प्रकार आहेत . विद्या आणि कला शिकविणारे विद्यागुरु आणि कलागुरु होत . […]
‘डिजिटल’ हा शब्द आला, की त्याला जोडून ‘डाटा’ हा शब्द येतोच. ‘डिजिटल’ पद्धतीने साठा केलेल्या ज्ञानाला किंवा माहितीला ‘डाटा’ म्हणतात हे आता बहुतेक सर्वांनाच कळतं. ह्या ‘DATA’तच मला ‘DAT(T)A’ दिसतो. Data आणि Datta यातील साम्य मला हेच सांगते, की ‘दत्त’ म्हणजे ‘ज्ञान’..! […]
शेगड्या, चुली जाऊन गॅस आला. बैलगाडी, घोडागाडी जाऊन बस रेल्वे विमानं आली. वायरचा फोन जाऊन मोबाईल आले, कॅसेट जाऊन CD आणि आता क्लाउड वरून डाउनलोड करणे सुरू झाले. इतके सारे बदल जवळजवळ दोन पिढ्यात आत्मसात झाले. मग असं असेल तर कीर्तन प्रवाचनांची आधुनिक काळाप्रमाणे प्लास्टिक सर्जरी करून आणि त्या नवीन रुपाला लोकमान्य करून सिनिअर सिटीझन क्लब मध्ये हळू हळू तरुण चेहरे दिसायला लागले तर ते भारतीय संस्कृतीसंवर्धनाच्या दृष्टीने चांगल ठरणार नाही का? […]