माणसाने परमेश्वराला प्रथम पाहिले ते सूर्याच्या रूपात. माणसांत आणि एकंदर सजीव सृष्टीत जे चैतन्य आहे ते सूर्यापासून आले आहे असे मानले जाते. परंतु या चैतन्यातून एकापेक्षा एक असे पराक्रम साकार करायचे असतील, तर सूर्योपासनेचे विशिष्ट असे शास्त्र तयार करायला हवे असे भारतातील ऋषींना वाटले. आणि त्यांनी केलेल्या चिंतनातून सूर्यनमस्कार जन्माला आले. यामुळे सूर्योपासना आणि सूर्यनमस्काराचे भारतीय संस्कृतीतील महत्त्व अनन्यसाधारण आहे. […]
एका ब्राम्हणाने पत्नीला विचारले… ” पाणी छान आणि थंड आहे.. आपल्या घरात फ्रिज नाही, कुठुन आणलेस..?” पत्नी म्हणाली – “शेजारच्या कुंभारा कडुन.!” ब्राम्हण – काय..? त्या शुद्राचे पाणी मला पाजलेस, तुला लाज वाटत नाही…? आपण ब्राम्हण आहोत… आपल्याला शुद्राचे काही चालत नाही..?” पत्नी म्हणाली – ( घाबरली व म्हणाली )” मला माफ करा, या पुढे अशी […]
गणपती बसवला म्हणून बौद्ध धर्मातून बहिष्कृत..! घटनेतील धर्म स्वातंत्र्य धोक्यात येतंय का..? कोणत्याही धर्मातील लोक देवाला का मानतात हो? कारण त्यांची देवावर श्रद्धा असते. प्रत्येक धर्माची आपल्या देवावर श्रद्धा बाळगण्याची वेगवेगळी पद्धती असते. त्याचप्रमाणे हिंदू धर्मामध्ये लोक आपल्या देवाची मूर्तीपूजा करून देवाप्रती असलेली आपली श्रद्धा दर्शवतात. त्यात वाईट असे काही नाही. […]
दर वर्षागणिक गणेशोत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढते आहे. स्वातंत्र्यानंतर गणेशोत्सवाचा उपयोग लोकप्रबोधनासाठी होऊ लागला. पण गर्दी जमते आहे हे पाहिल्यावर त्याचा फायदा उपटण्यासाठी, राजकीय नेते आणि जाहिरातदार व्यापारी तेथे घुसले. आणि नेमकी येथेच एका धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेची वाट लागायला सुरुवात झाली. […]
गणेशचतुर्थीला आजही घराघरातून गणपतीची प्राणप्रतिष्ठा, पूजा, आरती, अभिषेक, अथर्वशीर्ष पठण, नैवेद्य अशा गोष्टी अतिशय श्रद्धापूर्वक आणि धर्मिकपणे केल्या जातात. पण काही घरगुती गणेशोत्सवामध्ये आणि अनेक सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये आता खूप बदल होताना दिसतात. उत्सवी मांडवांमध्ये कोंबडी, पोपट, मैना, म्हावरा, चिमणी, लुंगी, दांडा, रिक्षा, झिंगाट अशा अनेक वैविध्यपूर्ण शब्दांवरील गाणी आपल्या कानांच्या, भक्तीच्या आणि मराठी संस्कृतीच्या चिंधड्या उडवत […]
विश्वातील सर्वात प्राचिन अश्या आपल्या हिंदू धर्मात ईश्वर एकच असला तरी त्याची अनेक रुपं मान्य केली आहेत. ईश्वर निर्गुण निराकार आहे हे मान्य करतानाच हिन्दू धर्माने, ईश्वराला सगुण साकार बनवूनही पुजलं आहे. आपला ईश्वर आपण जसा मुर्ती रुपात साकारतो, श्रद्धेने पुजतो, त्याच आणि तेवढ्याच श्रद्धेने आपण निसर्गातही देव शोधतो. ईश्वर सर्वव्यापी असून अवघे चराचर व्यापून वर दशांगुळे उरतो असं मानणाऱ्या आपल्या पूर्वजांनी, निसर्गातल्या विविध चल-अचल रूपातला ईश्वर स्विकारला त्यात नवल ते काय..! […]
ऋषिपंचमी हे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला साजरे करतात. कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वसिष्ठ हे सप्तर्षी आहेत. ज्या ऋषींनी आपल्या तपोबलाने जगतातील मानवावर अनंत उपकार करून ठेवले आहेत, मानवाच्या जीवनाला योग्य दिशा दाखविली आहे,त्या ऋषींचे स्मरण या दिवशी केले जाते. मासिक पाळी,अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने,तसेच गोकुळाष्टमीच्या उपवासानेही कमी होतो. […]
‘गणेश’ हे नांव तयार करणारी मराठी वर्णमालेतील ‘ग’, ‘ण’ आणि ‘श’ ही तीन अक्षरं अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ह्या तिनही अक्षरांमध्ये त्यांचा काना स्वतंत्र, म्हणजे मुख्य अक्षरापासून किंचित अंतर राखून अदबीने उभा आहे. ह्या तिनच अक्षरांचं हे वैशिष्ट्य. ह्या तीन अक्षरांव्यतिरिक्त बाकीची अक्षरं कान्याचा आधार घेऊन किंवा कान्यात गुरफटून किंवा ‘ळ’सारखी काना(कणा)हीन होऊन उभी आहेत.. गणेश नांव […]
|| हरी ॐ || वर्षानुवर्षे अग्रपूजेचा माझा मान, त्याचे नाही कधी चुकले भान! या वर्षी येताना मनात शंका नाना, आनंदाने स्वागत होईल ना? शेतकरी झाले होते अवर्षणाने हैराण, पीक गेले हातचे शेत झाले वैराण! माझ्याकडे विनंती आर्जव त्यांच्या मनात, आगमनाने बरसूदे पाऊस आमच्या शेतात! वरुणाला आज्ञा माझ्या बरोबर येण्या, नकळत बरसला बेटा वेड्यावीण्या! […]
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत […]