‘गुरु’चा महिमा जेवढा आपल्या संस्कृतीत सांगीतला गेलाय, तेवढा क्वचितच इतरत्र सांगीतला गेला असावा. “गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वर..गुरुः साक्षात्परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः:” हे वचन आपल्या नित्याच्या व नैमितिक म्हणण्यात असतं. ब्रम्हा, विष्णू आणि महेश या विश्वाची उत्पत्ती, पोषण आणि लयाला कारणीभुत असणाऱ्या, उभ्या भारत देशाच्या धार्मिक आणि सांस्कृतीक आस्थेचा भाग असणाऱ्या त्रिमुर्तीची बरोबरी, […]
पिक्चरच्या शूटिंगमध्ये शॉट चांगला झाला नाही तर रिटेक करतात. म्हणजेच पुन्हा तोच सीन करतात. पण आयुष्यात असे रिटेक घेत येत नसतात. म्हणूनच प्रत्येक क्षणी वन टेक ओके व्हावा इतकं प्रसन्न हवंहवंसं जगलं तर…? […]
हा अतिशय सुंदर लेख शेअर करतोय. लेखक माहित नाही. “मी असा काय गुन्हा केला ?” हे शब्द मा. प्रमोद महाजन यांनी, मा.गोपीनाथ मुंडे यांच्याजवळ, आपल्या अंत समयी उच्चारले होते. आपल्या सख्ख्या भावानेच गोळ्या घातल्यावर विचारांच्या कल्लोळातून त्यांना असे व्यक्त व्हावेसे वाटले होते. “अरे, अरे हे काय करताय ?” असे इंदिराजींनी अतिशय अविश्वासाने आपल्या मारेक-यांना विचारले होते. […]
जनाबाईचे अभंग दूरदूपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबिरांच्या कानी गेली, इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोव-या थापायला गेली आहे, तिला येण्यास काही अवधी लागेल. दासीचे घरकाम […]
ग्रामिण, कृषी संस्कृतीतील स्त्री-गीतांत आढळणारा ‘विठू’, ज्यांचं नांव-गांव कोणालाही ठाऊक नाही अशा स्त्रीयांच्या भावविश्र्वातलं विठ्ठलरूप ग्रामिण बोलींत हजारो अविट ‘वव्या’तून व्यक्त झालं आहे..परपंचात परस्वाधीन असलेल्या बायकांचं नशिब काही पुरुषांएवढं थोर नसतं, की उठले की चालले टाळ कुटत. . पांडुरंगाची ओढ त्या माऊल्यांना काही कमी नसते परंतू घरंच आणि दारचं करता करता, त्यांचं पंढरीला जाणं काही न […]
या दोन शब्दांचं अवघ्या महाराष्ट्रावर जी जादू आहे त्याला जगात कुठेच तोड नाही..रावा पासून रंका पर्यंत आणि मुख्यमंत्र्यापासून ते अगदी सामान्य माणसापर्यंत या दोन शब्दांचं आणि त्यावरच्या भक्तीचं गारुड आहे.. शेक्सपिअरने नांवात काय असतं असं म्हटलं होतं. त्यानं असं का म्हटलं, ते मला सांगता येणार नाही पण नांवात बरंच काही असतं हा माझा अनुभव आहे. अन्यथा […]