त्याची पत्रिका मी माझ्या पद्धतीने पाहिल्यावर माझ्या लक्षात आले त्याचा जन्म सत्तावीस नक्षत्रातील सर्वात विषारी समजल्या जाणाऱ्या आश्लेषा नक्षत्रात झालेला होता त्यामुळेच त्याच्यावर हे आकस्मित संकट ओढावले होते त्याला निमित्त मात्र त्याच्या वडिलांचे बिडी पिणे आणि त्यामुळे झालेला कर्करोग होता भविष्य कोणालाही टाळता अथवा बदलता येत नाही ज्योतिष शास्त्रामुळे फक्त त्याचा अंदाज घेता येऊ शकतो इतकंच … […]
आपल्या आजूबाजूला खूप घटना घडत असतात, चांगल्या, वाईट. आपला थेट संबंध नसला तरी घटना आपल्याला काही शिकवत असतात, फक्त गरज असते ती आपण “जागे” असायची. आपण खरेच “जागे” अथवा “जागृत” असतो का ? किंवा बघून तरी “जागे” होतो का ? कोणी तरी “जागे” करावे लागते, संत देखील आपल्याला “जागे” करायचा प्रयत्न करीत असतात. सदगुरुंचा अनुग्रह होणे […]
एकदा सदगुरु आणि देव असे दोघे एका शिष्याच्या घरी येतात तेव्हा शिष्य पहिल्यांदा देवांच्या पायाजवळ नमस्कार करायला जातो, देव त्याला म्हणतात , “तु पहिले सदगुरूंना नमस्कार केला पाहिजेस”. जेव्हा शिष्य हा सदगुरूंच्या पायापाशी जातो तेव्हा सदगुरु म्हणतात “मी देवाला तुझ्या घरी आणले आहे त्यामुळे पहिला देवाला नमस्कार कर.” शिष्य परत देवाच्या चरणाजवळ येतो, तेव्हा देव म्हणतो […]
माणूस : देवा रागावणार नसशील तर एक प्रश्न विचारु का? देव : विचार ना. माणूस : देवा, माझा आजचा दिवस तू एकदम खराब केलास. असं का केलंस तू देवा? देव : अरे काय झालं पण ? माणूस : सकाळी अलार्म वाजलाच नाही . मला उठायला खूप उशीर झाला . देव : बरं मग ? माणूस : […]
एक चित्रकार होता.गुरूचा सर्वात आवडता शिष्य आणि उत्कृष्ट चित्रकार असूनही त्याला कोणताही गर्व नव्हता.गुरू व स्वत:च्या कलेवर त्याला प्रचंड विश्वास होता. पण स्वत:वर त्याचा विश्वास फारसा नसावा. तीन दिवस परिश्रम करून त्याने एक सुंदर चित्र काढले. पण ‘आपले चित्र चांगले आहे का?’हा प्रश्न त्याला कुणाला तरी विचारावासा वाटला. एका गजबजलेल्या रस्त्यावर त्याने त्याचे ते चित्र लावले. […]
एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते. तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो….वाघ जोरात झेप […]
सोलोमन बेटावर आदिवासी जमातीचे वास्तव्य आहे. ते आदिवासी लोक प्रथेनुसार झाडे तोडणे अपशकुनी समजतात. एखादे झाड तोडायचे असेल तर एकत्र येऊन दररोज झाडाभोवती वर्तुळाकार तास न तास बसून झाडाला नकरात्मक लहरींनी (negative destructive frequency) घायाळ करतात. आश्चर्याचा भाग म्हणजे काही आठवड्यात ते झाड शुष्क होऊन उन्मळून पडते. हे उदाहरण कोणालाही पचनी पडणे अवघड आहे. ते अविश्वसनीय […]
ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. स्तोत्रपठणाचं वैशिष्ट्य म्हणजे […]
आपण सर्व भाविक छोट्या मोठ्या समस्यांमुळे काहि सेवा करत असतो. उपासना करत असतो. त्या अंतर्गत आपले सद्गुरु आपल्याला काहि मंत्र पठण करवयास सांगतात. ते स्तोत्र, मंत्र, उतारे , तोडगे करत असताना मनात श्रद्धा भाव हा खुप महत्वाचा असतो. पण काही लोक त्याला अंधश्रद्धेचे नाव देऊन ढोंग ठरविण्याचा प्रयत्न करतात आणि आपण ही हळू हळू त्यांच्या बोलण्याने भुलु लागतो. पण आपण […]