लेखाची ओळख :: झाडांच्या बियांत, सर्व पोषणमूल्ये असलेली तेले आणि अितर घटक का असतात? तसेच, बाळंत झाल्यानंतर आअीच्या स्तनांत, सर्व पोषणमूल्ये असलेलं दूध का निर्माण होत? हे सांगणारा लेख. […]
ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे आधुनिक सत्पुरुष! गाडगे महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे, लहानाचे मोठे झाले. त्यांच्या मामाची […]
आपण, म्हणजे वर्तमानकाळातील पिढी आणि महाभारतकाळातीलही पिढी, आपल्या म्हणजे त्यांच्याही पूर्वजांच्या रुपात अस्तित्वात होते, महाभारतकाळातील माणसेही, त्यांच्या वंशजांच्या स्वरूपात आजही अस्तित्वात आहेत आणि आपण सर्वजण, पृथ्वीवर सजीव जगू शकतात तो पर्यंत, आपल्या उत्क्रांत झालेल्या वंशजांच्या स्वरूपात अस्तित्वात असणारच आहोत, हे खर्या अर्थाने समजणे कठीण आहे असे मला वाटते. यासंबंधीच या लेखात चर्चा केली अअहे. […]
सिग्मंड फ्राईड एकदा बायको व मुलाला घेऊन बागेत फिरायला गेला. मुलगा छोटा होता. आई-वडील गप्पात गुंग झाल्यावर तो हळूच तेथून संधी साधून गायब झाला. थोडया वेळानंतर समोरच खेळणारा मुलगा गेला कुठे म्हणून आई कासावीस झाली. घाबरून ती इकडे तिकडे त्याला शोधण्यासाठी पळू लागली. घाबरलेल्या, सैरावैरा पळणार्या आपल्या पत्नीला फ्राईड म्हणाला, ‘‘अगं मला एवढंच सांग आपला बागेत […]
मागच्या पिढीशिवाय पुढच्या पिढीचा जन्म होत नाही हे विज्ञानीय सत्य आहे. याची चर्चा आपण मागच्या आठवड्यात केली. मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म …… ही साखळी अशीच चालू होती म्हणूनच माझा जन्म होअू शकला. मी आणि माझ्या बायकोनं, आमच्या अपत्यांना जन्म दिला. त्या अनुषंगानं केलेली ही कविता वाचा आणि त्यावर […]
स्वामींच्या चित्राखाली तुम्हांला एक वाक्य दिसेल, “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !” आता ह्यात शब्द किती तर सहा. आता ह्यातल्या कुठल्याही शब्दामागे “च” हे अक्षर लावा आणि अर्थ बघा कसा होतो. “भिऊच नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” “भिऊ नकोसच मी तुझ्या पाठीशी आहे” “भिऊ नकोस मीच तुझ्या पाठीशी आहे” “भिऊ नकोस मी तुझ्याच पाठीशी आहे” […]
सजीव, त्यांची पुनरुत्पादन यंत्रणा आणि त्यांचा जन्म, या विषयी विचार करता करता काही कवितां स्फुरल्या. त्यापैकी काही येथे देत आहे. कारण त्या, माझ्या … आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांताशी संबंधीत आहेत. माझा जन्म….. माझा जन्म हा …. माझ्या आअीबाबांचा निर्णय होता. या पृथ्वीवर …. जन्म घेण्याशिवाय मला दुसरा पर्यायच नव्हता …. प्रत्येक सजीवाच्या बाबतीत हे अगदी खरं […]
माझी तत्वसरणी कदाचित कुणालाही सहजासहजी पटणार नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीपण ती सर्वाना सांगण्याचा मोह टाळता येत नाही. विचारांची दिशा म्हणजे विचारसरणी….तसेच तत्वांची दिशा म्हणजे तत्वसरणी असा अर्थ समोर ठेअून मी हे लेख लिहिले आहेत. जेव्हा मानव भोवतालच्या निसर्गाचं निरीक्षण करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, निसर्गातील घटना घडण्यामागं प्रचंड शक्ती आणि कमालीची […]