रविवार – श्रावणातील प्रत्येक रविवारी गभस्ति नावाच्या सूर्याचे पूजन करण्यास सांगितले आहे. हे पूजन मौनाने करावे असेही शास्त्रात सांगितले आहे. सोमवार – श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवांचे पूजन करण्यास सांगितले आहे. तसेच प्रत्येक सोमवारी शिवमुष्ठि नावाचे व्रत करावे. हे व्रत विवाह (लग्न) पश्चात पाच वर्षे करावे. सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी. प्रत्येक सोमवारी धान्याच्या पाच मुठी […]
या महिन्याचे पौर्णिमेच्या आजूबाजूला श्रवण नक्षत्र येत असल्याने या महिन्याला श्रावण असे म्हणतात. या महिन्यापासून वर्षाऋतू सुरू होतो. या महिन्यात दररोज कोणते ना कोणते व्रत सांगितले आहे. त्यामुळे या महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते. हा महिना चातुर्मासांत येत असल्याने सध्या अनेक लोक संपूर्ण चार महिने नियम पाळणे शक्य होत नसल्याने या महिन्यापुरते तरी नियम पाळतांना आढळतात. […]
अथर्वशीर्षात गजाननाबद्दल, रक्तिम-वस्त्रे-परिधान-केलेला, रक्तगंधानें-लिप्त-अंग असलेला, रक्तपुष्प-पूजित असे उल्लेख आहेत. गजाननाला रक्तवर्ण (लाल रंग) प्रिय आहे, असे अन्यत्रही उल्लेख आहेत. असें कां बरें ? याचें उत्तर पुरातन वाङ्मयानेंच दिलेले आहे. त्यात उल्लेख केलेला आहे की, गजानन हा आरंभीच्या काळात ‘विघ्नेश’, ‘विघ्नकर्ता’ होता; आणि नंतर त्याचें ‘विघ्नहर्ता’ हें रूप प्रचलित झाले. अरेच्चा !! पण इतका उलटा बदल कसा […]
गजानन हा गणांचा प्रमुख आहे. गण म्हणजे समूह. पूर्वी भारतात गणराज्यें होती, तेव्हां गण या शब्दाचा ‘समूह’ हाच अर्थ प्रचलित होता. आजही आपण ‘भारतीय गणराज्य’ अशा नामाभिधानात याच अर्थानें हा शब्द वापरतो. आपलें राष्ट्रगीत ‘जन-गण-मन’ यातही हाच अर्थ अभिप्रेत आहे. तेव्हां, गणाधीश म्हणजेच ‘समूहाचा प्रमुख’. आतां प्रश्न असा उठतो की, हा समूह कुठला ? तर, हा […]
प्रास्ताविक : आजचें युग हें विज्ञानयुग आहे. आतां विज्ञानाच्या भिंगातून जुन्या संकल्पनांचें विश्लेषण होतें आहे. आपणही आतां विज्ञानाच्या कसोटीवर गणपतीचा विचार करणार आहोत. गजाननाच्या सर्वमान्य रूपातील मुख्य घटक कोणते, तें सर्वप्रथम पाहू या. ते आहेत – • हत्तीचें मस्तक ; म्हणजेच हत्तीसारखी सोंड व हत्तीप्रमाणे सुपासारखे कान • हत्तीसारखा मोठा, पण एकच दात (सुळा, tusk) ; […]
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुका येथील श्री. गोदड महाराज यांचा जन्म शके १६८१ श्रावण शुद्ध दशमी, गुरुवारी झाला. महाराजांचे जन्मनाव “अमरसिंह” होते ते स्वभावाने विरक्त , निर्भय अणि शीघ्रकोपी होते ,वडिल भिकाजी हे राजस्थानातील उदयपुर संस्थान येथील पराक्रमी राजवंशातिल होते तर आई चंद्रभागा ही कर्जत येथील तोरडमल कुटुम्बातिल होती. अमरसिंह वयाने सहा सात वर्षाचे असतानाच त्यांच्या मनात […]
मारुती हा ‘मरुत’ म्हणजे साक्षात ‘वायु”चा पुत्र मानला गेला आहे. इथं वारा म्हणजे आपण अनुभवतो ती झुळूक किंवा एखाद्या पठारावर येणारा फणाणता वारा नव्हे, तर साक्षात झंझावात, वादळवारा..! या वाऱ्याची ताकद काय हे बघण्यासाठी अधनं-मधनं ‘डिस्कन्हरी’ किंवा ‘नॅशनल जिआॅग्राफीक’ चॅनल पाहत जावं..तीथं मारुतीला वायुपुत्र का म्हणतात त्याचा अनुभव घेता(पाहता) येतो..याचं एक उदाहरण म्हणून आपण रामायणातला एक […]
शिंगणापूरच्या शनी मंदिरात स्त्रियांना प्रवेश असावा कि नाही याच्या वादामुळे माझ कुतूहल चाळवल गेलं आणि मुळात अशी बंदी का लादली गेली असावी याचा विचार मन करू लागलं..माझ्या मनाने माझ्या ज्येतिषशास्त्राच्या अभ्यासाशी लावलेली संगती आपल्यासमोर ठेवतो..या विषयातील तज्ञ मार्गदर्शन करतीलच. ज्योतिषात शनीला अत्यंत महत्व दिल गेलं आहे. शनी हा पहिल्या प्रतिचा अशुभ ग्रह मानला गेलेला आहे. मृत्यूचा […]
‘ॐ’ काराला फक्त ‘शब्द’ म्हणणे म्हणजे हिमालयाला टेकडी म्हणण्यासारखे आहे. खरंतर अवकाश-आकाश-पृथ्वी-पाताळ व्यापूनही उरलेला असा ॐ हा ध्वनी आहे. आपल्या हिन्दु धर्मातील प्रत्येक शुभकार्य ‘ॐ’ शिवाय सुरू होत नाही..ॐ काराचे अनेकांना अनेक अर्थ जाणवत असतील, मला जाणवला आणि पटला तो तुम्हां समोर ठेवतो.. ‘अ’ कार, ‘उ’ कार आणि ‘म’ करापासून तयार झालेला ॐ हा ध्वनी जगातील […]