“संयम राखा… भरपूर उपभोगत आनंदी रहा…” कोणे ऐके काळी म्हणायचे,” स्वताःच ठेवाव झाकुन… दुसऱ्याच पहाव वाकुन….”…. म्हणजे आजकाल या म्हणीला काही अर्थ उरलाय अस वाटतच नाही.. कारण स्वताः कडे असलेल आपण झाकुन ठेवण्यापेक्षा दुसऱ्यांकरीता ऊघडुन स्वताःच नाराज होतोत….. म्हणजे एखादी वस्तु आपण नविन आणल्यावर भरपुर आनंदात असतोत… कारण तीच वस्तु ईतरांकडे नाही म्हणुन आनंदीच असतोत.. पण […]
आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो….. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात….. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे….. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे….. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे….. एवढेच नव्हे तर […]
भक्तमनीं कैवल्याची इथें गळाभेट रे पंढरीत मोक्ष दावी पंढरिची वाट रे ।। आस एक – पुण्यद पाहिन नदी चंद्रभागा ध्यास एकमात्र – मोक्षद बघिन पांडुरंगा एकमात्र भास – दिसतें रूपडें अवीट रे ।। स्वप्नवत् जहालें – गेलो पंढरिनगरात मी भारुन, कर जोडुन, ठाके विठूमंदिरात मी मंत्रमुग्ध होउन पाही विठ्ठलपदिं वीट रे ।। तेज आगळें विठूच्या सावळ्या […]
सर्व थरांतिल नारि-नरांना उघडें मंदिर आहे विठुरायाच्या वारकर्यांना उघडें मंदिर आहे ।। विठुराया ज्यांचा सांगाती नाहीं त्यांना ज़ातीपाती उच्च-नीच नाहीं, सार्यांना उघडें मंदिर आहे ।। उभे पुजारी-सेवक-बडवे कुणि न विठूच्या भक्तां अडवे अष्टप्रहर, साती वारांना उघडें मंदिर आहे ।। प्रपंच विसरुन केलिस वारी अजुन थबकसी कां बाहेरी ? कड्याकुलुप नाहीं दारांना, उघडें मंदिर आहे ।। हातांमध्ये […]
१७ ऑगस्ट २००८ साली माझा हा लेख लोकसत्ता मध्ये आला होता. हायकोर्टाच्या ताज्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मी हा लेख मराठीसृष्टीवर टाकत आहे. गणेशोत्सवा चे स्वरूप हे उत्सव साज-या करणा-या कार्यकर्त्यांच्या गुणांवर अवलंबून असते .लोकमान्य टिळकांनी राजकारणाबरोबर समाजाला एकत्र आणण्यासाठी जे प्रयत्न केले ,त्यातूनच शिवजयंती ,गणेशोत्सव या सारखे उत्सव करण्याची परंपरा महाराष्ट्रात उदयास आली.राजकारण आणि धर्म या एकाच […]
१) जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल अंगकांती असलेल्या, कश्यप ऋषींच्या वंशांत जन्मलेल्या अत्यंत तेजस्वी, अंधाराचा शत्रू, सर्व प्रकारची पापे नष्ट करणार्या दिवसाच्या राजाला, सूर्याला मी नमस्कार करतो. २) दही आणि शंख यांच्या तुषारांप्रमाणे शोभून दिसणार्या, क्षिरसागरांतून निर्माण झालेल्या, भगवान शंकराच्या डोक्यावर दागिन्यांप्रमाणे शोभणार्या आणि ससा धारण केलेल्या सोमाला (चंद्राला) मी नमस्कार करतो. ३) धरणीच्या पोटांतून जन्म घेतलेल्या, विजेसारखी […]
खूपशी हिंदुद्रोही मंडळी वाद घालताना एक प्रश्न हमखास विचारतात, कि “तुमच्या त्या फडतूस हिंदू धर्मात म्हणे ३३ कोटी देव आहेत, त्यांची नावे तरी माहिती आहेत का तुम्हाला?” आणि आमचे भोळे-भाबडे हिंदू बंधू या प्रश्नासमोर गडबडून जातात. मलाही व्याख्यानाच्या वगैरे निमित्ताने जेव्हा इतर मंडळी भेटतात, तेव्हा हा प्रश्न विचारणे ठरलेले असते. कधी खोडसाळपणे, तर कधी जिज्ञासेने! तेव्हा […]
एप्रिल १७, २०१६ च्या लोकसत्ता-लोकरंग मधील मंगला आठलेकर यांचा ‘याला धर्मसुधारणा म्हणता येईल काय ?’ हा स्त्रियांच्या मंदिर-प्रवेशासंबंधीचा लेख वाचला ; व ८ मे, २०१६ च्या लोकरंगमधल्या. त्या लेखावरील प्रतिक्रियाही वाचल्या. आठलेकरांचा लेख उत्तम आहे. मात्र, आठलेकरांचा लेखातील कांहीं विचार वाचून सखेद आश्चर्य वाटलें. तेंच प्रतिक्रियांचेंही. या विषयावर अधिक-खोलवर विचार व्हायला हवा होता, असें मला वाटतें. […]
श्वासोछ्वास ही शरीराची अत्यंत महत्वाची नैसर्गिक क्रिया आहे. जीवंतपणाचे ते सर्वांत प्रमुख लक्षण असते. श्वास आहे तर जीवंतपणा आहे. त्याच्या शिवाय देह केवळ मृत झालेला असेल. जगण्यासाठी प्राथमिक गरज असते ती प्राणवायुची. अर्थात ऑक्सिजनची. वातावरणात तो मुबलक प्रमाणांत असतो. शरीर तो शोषून घेतो. व त्यातून शक्ती अर्थात उर्जा प्राप्त होते. जगण्याचे ते आद्य व प्रमुख साधन. […]