पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील सुप्रसिध्द मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व निगर्वी, सत्याचे पाईक असा त्यांचा स्वभाव होता. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर ही त्यांची रहावयाची इमारत होती.
[…]
अध्यात्मिक / धार्मिक स्वरुपाचे लेखन या विभागात असेल…
श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील सुप्रसिध्द मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व निगर्वी, सत्याचे पाईक असा त्यांचा स्वभाव होता. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर ही त्यांची रहावयाची इमारत होती.
[…]
कार्तिक महिन्याच्या त्रिपुरारी पोर्णिमेला कनकेश्वराचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे यात्रा भरते. आवास येथील नागेश्वराच्या यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी भरणारी यात्रा म्हणजे कनकेश्वराची यात्रा. चिमाजी अप्पांच्या वसई मोहिमेतून विजय चिन्ह म्हणून ज्या पोर्तुगीज घंटा गावोगावी गेल्या, त्यातील एक घंटा या मंदिरात आली. प्रतिष्ठित अशा मारियांना डिमेलो या स्त्रीने इ.स. १६६६ मध्ये ही घंटा अर्पण केली, असा उल्लेख आहे. कनकेश्वर […]
दक्षिण बालीत जम्बरन येथे असलेली व अग्निरूप म्हणून ओळखली जाणारी ही गणेशाची पाषाणमूर्ती दोन हाताची असून ती सातव्या किंवा आठव्या शतकातील असावी. बलीत इतरत्र ब्रान्झ धातूच्या मूर्ती असताना हीच मूर्ती फक्त पाषाणाची आहे, हे पहिले वैशिष्टय होय.
[…]
गीतेच्या या श्लोकानुसार आत्मा, मानवी शरीरात, जन्मापासून मरेपर्यंत असतो आणि मृत्यूनंतर तो दुसर्याा शरीरात प्रवेश करून पुनर्जन्म घेतो. आत्म्याच्या आनुवंशिक तत्व सिध्दांतानुसार, आनुवंशिक तत्व म्हणजेच आत्मा असतो आणि तो गर्भधारणेपासून मरेपर्यंत शरीरातच असतो. आनुवंशिक तत्व, जनक पिढीक़डून अपत्य पिढीत संक्रमित झाले म्हणजेच आनुवंशिक तत्वाचा पुनर्जन्म झाला असे..आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत मानतो.
[…]
पुरातन काळातील ऋषीमुनींची, धर्म संस्थापकांची आणि विचारवंतांची अशी कळकळीची इच्छा होती की सर्व प्रजा ज्ञानी, विद्वान, सुसंस्कृत, सुशील, नैतिक मूल्यांचे पालन करणारी, आरोग्यदायी वगैरे सदगुणांनी परिपूर्ण असावी. म्हणजे त्यांची संततीही तशीच गुणवान निपजावी. हे उद्दिष्ठ साधण्यासाठी त्यांनी सात्विक दिनचर्या सांगितली, धर्माचरणे सांगितली. धार्मिक ग्रंथरचना केल्या, धर्म संस्थापिले, ईश्वर, आत्मा, जन्म मृत्यूचे फेरे, मोक्ष, पुनर्जन्म, बर्यावाईट कर्मांची गोडकडू फळे, मृत्युनंतर सुख किंवा शिक्षा वगैरे संकल्पना रूढ केल्या.
[…]
एका ऋचा ( श्लोक ) मध्ये कितीतरी गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. ह्यांचा सखोल आभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल कि त्या काळातील ऋषी मुनि प्रत्येक विषयाचा किती साकल्याने विचार करीत होतें.
[…]
श्रीविष्णूच्या या दशावतारात श्रीविष्णूचे अस्तित्व असावयासच हवे. कोणत्या स्वरूपात श्रीविष्णू, या दहाही अवतारात सामावलेले असतील? साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या सजीवात आनुवंशिक तत्व म्हणजे जेनेटिक मटेरीअल अस्तित्वात होते. त्याच्यातच उत्क्रांती होतहोत कोट्यवधी प्रजाती उत्क्रांत झाल्या. शेवटी मानव अवतारातहि तेच उत्क्रांत आनुवंशिक तत्व अस्तित्वात आहे. याचा विज्ञानीय अर्थ असा की आनुवंशिक तत्वच, श्रीविष्णूच्या दहाही अवतारात श्रीविष्णूचे प्रतिनिधित्व करते. याचा सरळ सोपा अर्थ म्हणजे, आनुवंशिक तत्व म्हणजेच श्रीविष्णू. अध्यात्मात बुडालेले विज्ञान !!!
[…]
भगवतगीता या, सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या महान ग्रंथावर अनेक विद्वानांनी भाष्य केले आहे. गीतेच्या १८ अध्यायात वेदोपनिशदांचे तत्वज्ञान सामावलेले आहे. सांख्ययोग म्हणजे गीतेचे सार, गीतेचा अर्क समजला जातो. […]
अ-जपा जपाबद्दलची माहिती क्वचितच कांही लोकांना असेल. ‘हे मोठे रहस्य आहे’ […]
शरीर रचनेचा अभ्यास करताना बऱ्याच गोष्टी खूप मजेदार आणि ज्ञान देणाऱ्या वाटल्या. ह्या जगांत अनेक घटना घडत असतात. त्या स्थिर वा हलचालीयुक्त दिसून येतात. आपल्या शरीरांत देखील तशाच गोष्टी होत असतात. कदाचित् त्याचे रंग रुप वेगळे असतील. परंतु जगातील घडणाऱ्या आणि देहामध्ये घडणाऱ्या घटनामध्ये परिणामाच्या दृष्टीने विलक्षण साम्य असते.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions