असे सांगितले जाते की तपश्चर्येच्या अवस्थेत, श्री भगवतानंद गुरूंना स्वप्नात शक्तिपाताद्वारे कुंडलिनी शक्तीचा साक्षात्कार झाला आणि नंतर भगवान शिवांनी त्यांना श्रीरामाच्या कथेवर आधारित श्रीराघवेंद्रचरितम् हा ग्रंथ लिहिण्यास प्रेरित केले. प्रस्तुत राम ताण्डव स्तोत्र हे या ग्रंथाचा एक भाग आहे. तांडवाचा एक अर्थ भयंकर संहारक क्रिया असाही आहे. या स्तोत्राची शैली आणि भाव वीररस आणि युद्धाच्या भीतीने […]
गुरुतत्त्व कधी, कुठे, कसे आणि कोणत्या स्वरुपात प्रकट होईल हे सांगता येत नाही. घरच्या बकऱ्या, मेंढ्या जंगलात चरायला नेणारा धनगर कुटुंबातील लहानगा मुलगा अंगभूत कर्तृत्वाने पुढे मोठा होऊन जगाच्या कल्याणासाठी धनगर समाजातील रूढी व अनिष्ट विकृतीच्या मार्गाने जाऊ पाहणाऱ्या समाजाला सन्मार्गावर आणले. ३ ऑक्टोबर १८९२ रोजी बेळगावनजीक चिक्कोडी तालुक्यातील “अक्कोळ” या खेडेगावात गुरुतत्त्व अवतरले. मायाप्पा-सत्यवा या […]
श्री नृसिंह सरस्वती कारंजा या आपल्या जन्म स्थानावर मातेला वचन दिल्याप्रमाणे आले व. इ. स. १४१६ या वर्षी आपल्या उत्तर यात्रेस निघाले काशी येथे त्यानी मुक्काम केला. इ. स. १३८८ या वर्षी त्यानी वृध्द कृष्ण सरस्वती यांच्या कडुन संन्यास दीक्षा घेतली व आपली नवखंड यात्रा पूर्ण केली. क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक गौतमी तथा गोदावरी तटाक यात्रा करीत […]
गुरुतत्त्व मासिकाचा फेब्रुवारी महिन्याचा अंक हा सद्गुरु श्री नाना महाराज तराणेकर यांच्या जीवनचरीत्रावर आधारीत आहे. गुरुतत्त्वाचे हे ३४ वे पुष्प नानांच्या चरणी समर्पीत करीत आहे. मध्यप्रदेशातील तराणे या गावी यांचा जन्म झाला. यांचे पूर्वज खानदेशांतील घाटनांदराया गावी होते. वासुदेव भटजी जोशी (वाघे) या वैदिक ब्राह्मणाच्या कुळात नानांचा जन्म झाला. वासुदेवानंदसरस्वती यांची कृपा या घराण्यावर होती. वडिलांच्या […]
संत एकदा आपल्या वाट्याला आले की ते “जेथे जाऊ तेथे” सतत सोबत करत असतात- हरीप्रसाद /किशोर/उस्मान च्या रूपात ! मग वेगळ्या दर्शनाची, वारीची गरज पडत नाही. ते असतातच! […]
गुरुतत्त्व मासिकाचा ऑक्टोबर महिन्याचा अंक हा सद्गुरु श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या जीवनचरीत्रावर आहे. महाराजांचे जीवन हे अलौकीक आहे. आपल्याला वाचनातुन लक्षात येईलच. गुरुतत्त्वाचे हे ३० वे पूष्प महाराजांच्या चरणी समर्पीत करीत आहे. श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचे व्यावहारिक नाव दत्तोपंत होते. वडिलांचे नाव रामचंद्रपंत व मातोश्रींचे गोदाक्का उर्फ सीताबाई. श्री पंतमहाराजांचा जन्म श्रावण वद्य ८ शके […]
अथ श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे राजविद्याराजगुह्ययोगो नाम नवमोऽध्यायः ॥ इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी राजविद्याराजगुह्ययोग नावाचा नववा अध्याय श्रीभगवानुवाच । इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे । ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १ श्री भगवान म्हणाले, निष्कपटी तू म्हणुन तुला हे गुह्यज्ञान देतो जे जाणुन घेता अशुभातुन मुक्तिलाभ होतो १ राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् । […]
दत्त संप्रदायाची काशि म्हणुन गाणगापूर या तीर्थाचे महत्व सांगितले आहे. श्री नृसिहंसरस्वतीनी आपल्या ८० वर्षाचे कालखंडात १२ वर्षे क्षेत्र नरसोबाची वाडी येथे वास्तव्य केले. औदुंबर क्षेत्र (भिल्लवडी) व पंचगंगा संगम नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी ही दोन स्थाने म्हणजे नृसिहसरस्वतीची विशेष प्रीति असलेली ठिकाणे आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिह सरस्वती दोघेही कृष्णानदीचे भक्त होते. साक्षात हरीतनु कृष्णा […]
अष्टलक्ष्मीस्तोत्रम् हे स्तोत्र १९७० च्या आसपास श्री श्रीनिवास वरदाचारियर स्वामी यांनी रचलेले आहे. या स्तोत्रात लक्ष्मीची विविध आठ रूपे वर्णन केली आहेत. त्याची रचना दुसरी सवाई किंवा श्रवणाभरण (गण- न ज ज ज ज ज ज ल ग) (२३अक्षरे) या वृत्तात केली आहे. तथापि ती काही श्लोकात थोडीशी विस्कळित वाटते. काही ओळीत अक्षरांची संख्या कमी जास्त झालेली […]