अष्टविनायक ही संकल्पना आपल्या सगळ्यांना परिचित असून आपण सर्वजण त्या स्थानांची आवर्जून यात्रा करतो. ही अष्टविनायकांची स्थाने बरीचशी प्राचीन असून या प्रत्येक स्थानाला पौराणिक, धार्मिक, ऐतिहासिक बैठक आहे. या सर्व गणेशस्थानांमध्ये देवांनी, असुरांनी, ऋषींनी, भक्तांनी गणेशाची आराधना केलेली असून त्याचे प्रतीक म्हणून गणेशमूर्तीची स्थापना केलेली आढळते. […]
अतिशय श्रध्देय असणारे जागृत देवस्थान आहे. देऊळ चौसोपी असून भक्तांच्या वंदन पूजन, अर्चन, भजन, किर्तन, पादसेवन आदि सेवांच्या परिपूर्तीसाठीच मुख्यत्वे बांधलेले असल्यामुळे त्याची रचना, उभारणी अतिशय साधी आहे. देवळाचा अलिकडेच जिर्णोध्दार करण्यात आला आहे. हे करताना देवळाच्या मूळ धाटणीत बदल करण्यात आलेला नाही. देऊळ आंग्रे कालीन (वा कदाचित त्या पूर्वीपासून) अस्तित्वात असावे असे पुरावे उपलब्ध आहेत. […]
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील २१ सिद्धीविनायक यात्रेला जाण्याचा योग आला. औरंगाबादहून नागपूरच्या रस्त्याला लागलो. मध्ये यवतमाळच्या अलीकडे जानक एक आठ- नऊ वर्षांचा मुलगा सारखा आमच्या मागून धावत येत होता. धावताना काही खाणाखुणा करीत होता. […]
जपानमध्ये गणपतीची २५० देवळे आहेत. कन्जिटेन या नावाने तो तिकडे ओळखला जातो. कन्जिटेन म्हणजे भाग्यदेवता. सुखकर्ता, समृद्धी देणारी देवता. मध्य अशिया आणि जगातल्या अन्य भागात गणपती या देवतेची फार पूर्वी साग्रसंगीत पूजाअर्चा कशी होत असे ते ऑक्सफर्डने प्रसिद्ध केलेल्या अनेक पुस्तकातून वर्णिले आहे. […]
‘श्री स्वामी समर्थ’, हा शास्त्र शुद्ध-स्वयंभू आणि स्वत: श्री स्वामी समर्थाची अनुमती असलेला मंत्र आहे. या लेखाच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ मंत्राची माहिती आपण पाहणार आहोत. […]
प्राणी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काशीक्षेत्र त्याला मान, प्रतिष्ठा, ऐश्वर्य, अन्न-पाणी, आसरा, भक्ती, ज्ञान देत राहील आणि अंतःसमयी त्याला मोक्ष प्राप्त करुन देईल, असे म्हटले जाते. काशीक्षेत्राचे महत्त्व सांगणारे असे अनेक प्राचीन व अर्वाचीन ग्रंथ आहेत. […]
या ओळी निव्वळ वाचल्या तरी समजतात. कारण ते शब्द समाजाच्या भट्टीतून आले आहेत. कोठेही आढेवेढे, जड शब्द, गूढ भाव असं काही काहीच त्यात नाही. व्यसनांनी ‘बहकलेल्या’ समाजाला त्या गर्तेतून बाहेर काढून देवघराकडे ओढत नेणारा आध्यात्मिक भाव सामान्यांना सहज कळावा, त्या भावांमध्ये तो लोटपोट व्हावा म्हणून शब्द सहज सुचतात. ते वाचा आणि सुधारणा करा… […]
ऐक्याचं मुद्दल जर मोडत नसेल आणि भक्तीचा विलास जर करता येत असेल, ऐक्याच्या मुद्दलाला धक्का न लागता म्हणजे अद्वैत अवस्थेला धक्का न लागता जर भक्ती होत असेल तर का न करावी? सागराला बाधा न येता जर त्याच्या वरची लाट त्याच्या वरचा तरंग होऊन मजा जर भोगता येत असेल तर का न भोगावी? […]
भारताची जगभर मंदिरांचा देश अशी ओळख आहे. हजारो वर्षांपासून इथे मंदिरे उभारली गेली. काही नगरांमधे अक्षरश: शेकड्यात मंदिरे आहेत. भुवनेश्वर) (ओडिशा). कांचीपुरम (तमिळनाडू), पट्टदकल आणि हम्पी (कर्नाटक), मसरूर (हिमाचल प्रदेश), खजुराहो (मध्य प्रदेश), अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. आजही अशी बरीच गावे आणि त्यातील मंदिरे आपण बघू शकतो. […]
एक प्रसंग आठवतो. पंडित जसराज यांची मैफल ऐकण्याकरिता नामवंत रसिक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जमलेले. पंडितजींची मैफल रंगली. भैरवीला त्यांनी विठ्ठलाचे भजन गाऊन ‘विठ्ठला विठ्ठला’ असा आर्त स्वर लावला. डोळे मिटून गात होते. एकरूप झाले होते […]