अनादी काळापासून भारतीय संस्कृती ही श्री दत्त अवतारांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. त्यांच्या आत्मज्ञानाचा, ब्रह्मज्ञानाचा संजीवन प्रवाह विश्वाच्या स्पंदनातून, चराचरातुन अखंड अविरतपणे धर्मरक्षणासाठी कार्य करीत आहे. श्री. दत्तात्रेयांचा पहिला अवतार सत्ययुगात महान तपस्वी श्री. अत्रीऋषी आणि महापतिव्रता साध्वी श्री. अनसुया यांच्या तपोबलामुळे झाला. व तो अखंड, शाश्वत. चिरंतन अवतार असल्याने त्याच परंपरेत त्यांचा अवतार मानले जाणारे […]
ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरु हा कृपामयी आहे. कैवल्याचे सोने प्रत्येकाच्या पदरात टाकणारा विश्वउदार आहे. तो विचारश्रीमंत आहे. आचारश्रीमंत आहे. तो विवेक श्रीमंतही आहे. इतकेच नव्हे तर सद्गुरु हा खरा सामर्थ्यवान आहे. सद्गुरु हा इतका सामर्थ्यवान आहे की प्रत्येक शिवाचेही सामर्थ्य तो आपल्या केवळ कैवल्य-अस्तित्वाने जिंकून घेतो. कारण एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे ती ही की शिव हा निराकारात स्थिर आहे. त्याचे सामर्थ्य हे त्याच्या भक्तांच्या सामर्थ्याच्या तुलनेतच त्या भक्ताकडून तोलले जाते. परंतु सद्गुरुचे सामर्थ्य दृश्य आहे आणि ते काही शिष्यांच्या सामर्थ्यदृष्टीकोनातून कधी तोलले जात नाही तर तो स्वयंभू सामर्थ्यवान आहे. […]
‘नामस्मरण” म्हणजे फक्त मुखाने नाम घेणे नव्हे तर त्या नामईश्वराला अभिप्रेत असलेले कर्म करीत जीवन जगावे म्हणजेच कोणत्याही जीवाला दुःख न देता सत्कर्म करीत जीवन जगणे हेच नामाशी अनुसंधान साधणे आहे. […]
“जगी सर्वसुखी असा कोण आहे? ” आपल्याच पूर्वकर्मांनी आपणच तयार केलेल्या संचिताची मूळच्या सुखदुःखरूप फळे जीवाला भोगावीच लागतात. सुखरुप असलेल्या पण दुःखाच्या कचाट्यात खितपत पडलेल्या अभागी जीवाचे वर्णन संतश्री प. पू. डॉक्टरकाका (डॉ. श्री. द. देशमुख) करतात. […]
‘ब्रह्मविद्येचा सुकाळ’ करणारे संत ज्ञानदेव आणि ‘हरिनामाचा सुकाळ’ करणारे संत नामदेव या दोन श्रेष्ठ संतांभोवती अवघं संतवाङ्मय अखंड वीणेसारखं झंकारत होते. तेराव्या शतकाच्या उत्तरचरणात प्रगट झालेल्या या दोन साक्षात्कारी संतांनी ‘अभंग’ रचनेला प्रथम सुरुवात केली आणि शाश्वत मराठी कवितेची ‘अभंग’वाणी अवकाशभर निनादू लागली. उन्हाचे चांदणे करणारे हे दोन अद्भुत महाकवी अभंग वाङ्मयाचे केवळ निर्माते नव्हते, तर […]
अन्नमय आणि प्राणमय कोशा मध्ये वस्तुचे अथवा व्यक्तीचे स्मरण ठेवण्यास तिचे नाम पुन्हा पुन्हा आठवणे अतीशय उपयोगी पडते, म्हणून ज्या वैखरी वाणीने आपण दृष्ट्याशी व्यवहार करतो त्या वाणीने सारखे नाम घेणे हा भगवंताची आठवण ठेवण्याचा प्रथम उपाय आहे. […]
समर्थांच्या आयुष्याचे ४ टप्पे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला टप्पा (१६०८ ते १६२०) जन्म ते गृहत्याग. दुसरा टप्पा म्हणजे समर्थांनी केलेली साधना, तपश्चर्या (१६२० ते १६३२) ह्या काळात नित्यनेमाने पुरश्चरण, अभ्यास, मनन, चिंतन तिसरा टप्पा (१६३२ ते १६४४) समर्थांनी तिर्थाटन, तिर्थाटनात संपूर्ण देशाचे अवलोकन केले. आणि चौथा टप्पा (१६४४ ते १६८२) समाप्रबोधन, सज्जनगडावर मूर्तीस्थापना आणि अखेर समाधी. […]
छत्रपती शिवाजी महाराज श्रीसमर्थांच्या आज्ञेप्रमाणे साधन करत. कोणत्याही ऐहिक विषयाच्या ठिकाणी त्यांची वासना नव्हती. पण श्रीतुळजाभवानीने दिलेल्या भवानी तलवार ह्या हत्यारात मात्र ती शिल्लक होती. म्हणूनच भवानी तलवार त्यांनी श्रीसमर्थांपुढे ठेवून नमस्कार केला व त्यांची आज्ञा घेतली. […]
रसग्रहण हा तर मेघाच्या दृष्टीने एक वेगळाच विषय. मार्गात येणारी प्रत्येक नदी त्याची प्रेयसी आहे. त्याच्या विरहात ती रोडावली आहे. त्या प्रत्येकीचे पाणी (णि) ग्रहण करीत रसग्राही मेघ पुढे सरकत राहतो. पाथेय म्हणून कमलतंतु धारण करणारे राजहंस, कर्दळीच्या कळ्या खाणारे हरीण शावक, मकरंद ग्रहणाने धुंद झालेले भ्रमर या सगळ्या रसांच्या सोबत भगवान महाकालाच्या मंदिरात आणि हिमालयावर प्रत्यक्ष भगवान शंकरांच्या सानिध्यात ओसंडून वाहणारा भक्तिरस हा एक वेगळाच आनंदोत्सव आहे. […]