दरवर्षी संक्रातीला लाखो भक्त देवरुखजवळील मार्लेश्वराच्या यात्रेला जमतात. आज रात्री मार्लेश्वरची पालखी, आलेल्या दिंड्या यजमान आणि मानकऱ्यांसह शिखराकडे प्रयाण करतील. १४ जानेवारीला पहाटे साखरपा येथील गिरीजादेवीच्या पालखीचे मानकऱ्यांसह आगमन झाल्यावर मुलगी पाहणे, पसंती, मागणी टाकणे, मानपान असे विधी संपन्न झाल्यावर १४ जानेवारीला(संक्रातीच्या दिवशी) दुपारी १२ नंतर श्री देव मार्लेश्वर आणि गिरीजादेवी यांचा विवाहसोहळा मंगलाष्टकांच्या साथीने मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. […]
हा व्यक्ती दिसतो तसा नाहीये, त्याच्या कपड्यांवर जाऊ नका, अमुक अमुक ठिकाणी 2 फ्लॅट आहेत याचे, अमुक हिल स्टेशन ला रिसॉर्ट आहे याचं. किंवा याच्या दिसण्यावर जाऊ नका, फिरतो गाडीतून पण देणी इतकी आहेत की कधीही लोकं येऊन मारू शकतात. […]
सोलापूरात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर हे मंदिर प्रसिद्ध आहे.दरवर्षी १२ जानेवारी रोजी मल्लिकार्जुन मंदिरापासून यात्रेस सुरुवात होते.श्री सिध्दरामेश्वराच्या योग दंडाचे प्रतिक म्हणून नंदीध्वज उभारले जातात. चार दिवस चालणाऱ्या या यात्रेस महाराष्ट्रसह कर्नाटक,आंध्रप्रदेश येथून लोक येतात. यात्रेत सहभागी होणारे भक्त हे पांढरे वस्त्र परीधन केलेले असतात, यास बाराबंदी असे म्हटले जाते. १२ जानेवारीला सिध्दरामेश्वरानी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना […]
कोणाचे दुःख कोणते असते याला काही सीमा नसते. एखादा काळा माणूस मी काळा का? म्हणून दुःख करीत बसतो तर एखादी गोरी बाई बाहेर गेल्यावर गोरेपण टिकवण्यासाठी ते झाकावे लागते या दुःखात बुडालेली असते. […]
स्वामी विवेकानंद म्हणजे साक्षात घनिभूत देशभक्ती.त्यांचा युवा पिढीवर प्रगाढ विश्वा्स होता.भारताच्या पुनरुत्थानच्या कार्यासाठी युवकच पुढे येतील,असा त्यांना विश्वासस होता.देशभक्तीचे मूर्तीमंत प्रतीक असणारे स्वामी विवेकानंद केवळ भारतासाठीच प्रेरक आहेत असे मात्र बिलकुल नाही. […]
एखाद्या गोष्टीचा त्रास होणे, दुःख होणे हे निसर्गाच्या नियमानुसार योग्य आहे पण, जर तेच दुःख गोंजारून पुढे गेले तर आयुष्याला वेग येण्या ऐवजी हातपाय लटपटायला लागतात. प्रगतीचा वेग कमी होतोच शिवाय वैद्याचा खर्च वाढतो. […]
हातातली टाळ वाजली की त्यातून येणाऱ्या आवाजाचा एक वेगळाच आनंद आपल्या शरीरात फुलून येतो अन आपणही त्या सुरात बेधुंद होऊन देवाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन जातो. […]
निसर्ग आहे म्हणून आपण आहोत, वृक्षांची सगळ्यात जास्त गरज ही माणसाला आहे. सावली घेण्यासाठी माणूस वृक्षाचा आधार घेतो, पावसा पासून संरक्षण मिळावे म्हणून आपण वृक्षाच्या खाली उभे रहातो. […]
प्रगतीची वाट सापडली की त्यावर पायाला चाकं फुटतात. मग वेग वाऱ्यापेक्षा अधिक होतो आणि यशाची गाडी धावू लागते. मन आनंदी होते, यश सुखावते, कष्ट मागे पडतात, श्रम वाहून जातात त्या यशाच्या अलोट महापुरात पण, त्या यशाच्या-प्रगतीच्या शिखरावर पोचलं आणि जाणवलं की आपण येथे एकटेच आहोत? तर? […]