पुरुषसूक्त हे ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील नव्वदावे सूक्त आहे. आपल्याला दिसणारे जग हे विराट परमेश्वराचा केवळ अंशभाग आहे हा या सूक्ताचा मुख्य विषय. विश्वपुरुष व त्याच्यापासून निर्माण झालेली सृष्टी यांचे वर्णन करणार्या या सूक्तात सोळा ऋचा असून रचयिता नारायण ऋषी व देवता पुरुष (परमेश्वर) आहे. मुख्यत्वे अनुष्टुप् छंदात रचलेल्या या सूक्ताची शेवटची ऋचा मात्र त्रिष्टुप् छंदात गुंफलेली […]
१९९६ साली माउलींच्या संजीवन समाधीला ७०० वर्षे पूर्ण झाली त्यावेळचे बरेच काही आठवत आहे. बाबा महाराज सातारकर यांचे वेल्हाळ “कैवल्याचा पुतळा ” बघणे/ऐकणे त्यावेळी मस्ट होते. माऊलींची लडिवाळ भाषा बाबा महाराजांनी अलगद टिपली आहे. प्रा. राम शेवाळकर यांच्या ओघवत्या आणि नादमयी भाषेत संत ज्ञानेश्वरांविषयी व्याख्यान ऐकायला मिळाले. येथेही पांडित्य नव्हते पण बरीच अज्ञात दालने खुली झाली. माउलींचा “योगी ” प्रवास दृगोच्चर झाला. […]
आपण काय म्हणून जगतो, काय म्हणून कर्म करतो, आपल्याला नक्की काय करायचे आहे, काय मिळवायचे आहे हे सगळं विचार करण्यास भाग पाडत असलं तरी कधी कधी आपली पेक्षा आपल्यामुळे कोणाचे काही बिघडत नाही ना? याचा विचार करणे जास्त महत्वाचे ठरते. […]
देवाने आयुष्य दिले ते जगण्यासाठी, जागण्यासाठी नव्हे हे ज्याला कळले तो सुखी होतो. एखादा माणूस मरेपर्यंत झटत राहतो, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत कष्ट करत राहतो त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच. […]
भगवान श्री गणेशांच्या उजव्या हाताला विराजमान असणाऱ्या श्री गणेश शक्तीला देवी बुद्धी असे म्हणतात. भगवान तिला आपल्या उजव्या हाताला स्थान देतात यातच तिचे श्रेष्ठत्व अधोरेखित आहे. […]