‘भज गोविंदम्’ हे जगद्गुरू आदि शंकराचार्य यांनी रचलेले काव्य आहे. लौकिक अर्थाने हे कोण्या देवतेचे स्तोत्र नसून ही एक छोटीशी रचना आहे. ताला सुरावर भजन म्हणून ते गायले गेले असले तरी त्यात वेदांताचे सार आहे आणि त्यात मनुष्याला एक विनवणी केली आहे की, विचार कर…. […]
श्रीमद् भगवद्गीतेतील हा श्लोक…. याचा अर्थ असा की निवा-यातील दिव्याची ज्योत जशी स्थिर असते तसेच चित्त, आत्मयोगाचे अनुष्ठान केलेल्या योगी मनुष्यास लागू पडते.. […]
एका खेडेगावामध्ये गणपती बाप्पांचं एक खूप जुन्या काळातील मंदिर होतं. सर्व बाजूंनी कुठे कुठे थोडसं मंदिराचं बांधकाम ढासळलेलं होतं. पण तरीही लोकांची गर्दी तिथे खूप होत असे. मंदिराच्या गाभार्यामध्ये श्री गणेशांची मूर्ती देखील तितकीच पूर्वीची…. एके दिवशी सर्व गावकऱ्यांनी मिळून गावामध्ये दरवर्षी होणाऱ्या सभेमध्ये, मुख्य पदाधिकाऱ्यांसमोर या मंदिराच्या बांधकामाबद्दल विषय मांडला. सर्वांनाच हा विषय योग्य वाटला. […]
असं म्हणतात की ऋग्वेदाच्या १० व्या मंडलातील या सुक्तात सृष्टीच्या उत्त्पत्तीच्या वेळचे जे वर्णन आले आहे ते बरेचसे Big Bang Theory (TV serial नव्हे!) या सिद्धांताशी मिळते जुळते आहे. तत्त्वज्ञ आणि शास्त्रज्ञ या भिन्न मार्गांनी जाणा-या विचारवंताच्या तर्कामधील हे साम्य विस्मयकारक आहे. तत्त्वज्ञाने तर्काने जे मांडावे तेच पुढे एखाद्या शास्त्रज्ञाने कसोटीने सिद्ध करावे हे विस्मयकारक असले तरी तथ्य आहे. काय असु शकेल याचं कारण? […]
जर आपला स्वभाव चांगला असेल आणि लोकांना आकर्षित करणारा असेल, तर लोक आपल्याजवळ येण्यासाठी उत्सुक होतील, म्हणून दुसऱ्यांना जिंकण्यासाठी मोठमोठ्या गोष्टींची आवश्यकता नसते, आवश्यक असतो तो आपला स्वभाव. जो दुसऱ्यांच्या दुःखात त्यांच्या सोबत राहतो, सुखात सहभागी होतो, अश्याच व्यक्तींना लोक आपलेसे करतात. […]
काय परिणाम होईल हे माहिती नसताना देखील, जेव्हा जयदीपने विश्वासाने स्वतःजवळ जे पण आले ते देण्याची तयारी ठेवली तेव्हाच त्याने त्या मोबद्ल्यात कितीतरी जास्त पटीने सुख मिळवले. जेव्हा आपण आपली मनस्थिती बदलतो तेव्हाच आपण आपल्या परिस्थितीत बदल घडवु शकतो. […]
म्हणावयास व समजण्यासही सोपे असे आर्या वृत्तात रचलेले हे स्तोत्र फक्त पाच श्लोकांचे आहे. हनुमान या दैवताचे स्थान महाराष्ट्रात फार मोठे असल्याने या स्तोत्रासंबंधी अधिक माहिती देण्याची आवश्यकताच नाही. […]
गुरुंची साथ मिळालेल्या शिष्याचा उद्धार हा निश्चित स्वरुपात होणारच. त्याच्या प्रगतीमध्ये कोणतीही अडचण येत नाही. त्याला जिवनामधल्या संकटांना सुक्ष्म रुपात पाहण्याची एक अलौकीक दॄष्टी मिळते. आणि आपल्या शिष्याला त्याच्याही कळत-नकळत त्याच्यातील अवगुणांपासुन त्याची सुटका करणे हे साक्षात सदगुरुचं वैशिष्टय…. […]
दृष्टीकोन….. कोणत्याही व्यक्तीच्या अभिव्यक्तीवर त्याच्या दृष्टीकोनाचा खोल प्रभाव असतो. विशेषतः कलाकारांच्या बाबतीत हा सिद्धांत प्रकर्षाने जाणवतो. कलाकार काय दृष्टीकोनातून विषयाकडे पाहतो यात त्याच्या सर्जनाची बीजे असतात. एकच विषय, विचार अथवा घटनेकडे बघण्याचा कलाकारांचा दृष्टीकोन जर भिन्न असेल तर त्यातून प्रसवणारी कलेची अभिव्यक्तीसुद्धा कमालीची भिन्न असू शकते. […]
संत आणि ऋषींची संगत म्हणजे जणु परीस स्पर्शाचा अनुभव… ज्यामुळे जीवनाचं सोनं होतं. संतांच्या सहवासात राहिल्यामुळे साक्षात परमेश्वराची भेट होते. हे देखील तितकेच खरे. असाच एक संत पंढरपूरमध्ये संत नामदेवांच्या काळात होऊन गेला. याचं नाव आहे भागवत. […]