या आणि यापुढच्या श्लोकांमध्ये भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवान श्रीहरीच्या भुवयांचे वर्णन करीत आहेत. त्या अत्यंत नयनमनोहर असणाऱ्या आणि हृदय आल्हादक अशा पद्धतीच्या हालचाल करणाऱ्या भुवयांचे वैभव सांगताना आचार्य श्री म्हणतात, […]
भगवंताच्या अत्यंत सुकुमार आणि उन्नत अशा कपोल प्रदेशांचे वर्णन केल्यानंतर, आचार्य श्रींची दृष्टी त्या दोन कपोलांच्या मध्ये असणाऱ्या, अत्यंत नयनमनोहर अशा नासिकेवर खिळते. तिच्या सौंदर्याचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, […]
भगवंताच्या नितांत रमणीय अशा प्रकारच्या दंतपंक्तीचे वैभव वर्णन केल्यानंतर त्या मुखकमलातून प्रकटणाऱ्या दिव्य वाणी चा विचार आचार्य श्री या श्लोकात करीत आहेत. […]
भगवंताच्या त्या ओठाचे वर्णन केल्यानंतर त्याच्या हालचाली नंतर आतून डोकावणाऱ्या दंतपंक्ती कडे आचार्यश्रींचे लक्ष जाते. त्या अनुपमेय सौंदर्य धारण करणाऱ्या दंत मालिकेचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, […]
इच्छा असेल तर मार्ग दिसेल. जेव्हा मनातून एखादी इच्छा प्रकट होते, मग ती काही मिळवण्यासाठी असो किंवा काही घडवण्यासाठी असतो, त्या इच्छेला मार्ग आपोआपच खुला होत जातो. इच्छा चांगली असेल, तर आपले आणि आपल्यासोबत इतरांचेही चांगलेच घडते. पण इच्छा वाईट असेल तर मात्र दुसर्यांसोबत आपलेही वाईट घडते. अशीच एक इच्छेला मार्ग दर्शवणारी ही कथा… […]
भगवंतांच्या कंठाच्या लोकविलक्षण सौंदर्याचे वर्णन केल्यानंतर अधिक उन्नत झालेली आचार्य श्रींची प्रतिभा भगवंताच्या अधरोष्ठावर म्हणजे खालच्या ओठावर खिळते. त्या अतिदिव्य रसपूर्ण ओठाचे वर्णन करताना आचार्य श्री म्हणतात, […]
भगवान श्रीविष्णूंना सहस्रबाहू असे म्हटले जाते. सामान्य अवस्थेत जरी भगवान चतुर्भुज दिसत असलेले तरी आवश्यकतेनुसार ते आपल्या हजारो हातांना प्रगट करतात. त्यावेळी ते आपल्या हातात अनेक आयुधे धारण करतात. त्या सगळ्यांच्या सह भगवंताच्या बाहूंचे वैभव आचार्यश्रींनी या श्लोकाचा स्पष्ट केले आहे. […]