पुरम्दरपुरंध्रिकां चिकुरबंधसैरंध्रिकां , पितामहपतिव्रतां पटुपटीरचर्चारताम् | मुकुंदरमणीं मणिलसदलंक्रियाकारिणीं, भजामि भुवनांबिकां सुरवधूटिकाचेटिकाम् ॥८॥ पृथ्वीवर जेव्हा एखादी स्त्री सम्राज्ञी पदावर आरूढ होते त्यावेळी इतर मांडलिक राजांच्या राण्या तिची दासी स्वरूपात सेवा करतात. आई जगदंबा त्रिपुरसुंदरी या अनंतकोटी ब्रह्मांडांची सम्राज्ञी असल्याने तिच्या सेवेला उपस्थित असणाऱ्या अलौकिक दैवी शक्तींचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, पुरंदरपुरंध्रिकां चिकुरबंधसैरंध्रिकां – पुरंदर […]
सकुंकुमविलेपनामलकचुंबिकस्तूरिकां , समंदहसितेक्षणां सशरचापपाशांकुशाम् | अशेषजनमोहिनीमरूणमाल्यभूषाम्बराम्, जपाकुसुमभासुरां जपविधौ स्मराम्यम्बिकाम ॥७|| भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज जगदंबेचे स्मरण करताना कोणत्या स्वरूपाचे ध्यान करतात त्याचे वर्णन करताना ते म्हणतात, सकुंकुमविलेपनाम्- कुंकुमासह अंगलेपन केलेली. आई जगदंबेने शरीराला चंदनाचा लेप लावलेला आहे. मस्तकावर हळदीचा लेप लावलेला असून त्यावर कुंकुमतिलक धारण केलेला आहे. अलकचुंबिकस्तूरिकाम् – अलक म्हणजे केसांमध्ये अर्थात भांगात कस्तुरी […]
स्मरेत्प्रथमपुष्पिणीं रुधिरबिन्दुनीलांबरां, गृहीतमधुपात्रिकां मधुविघूर्णनेत्रांचलाम् | घनस्तनभरोन्नतां गलितचूलिकां श्यामलां, त्रिलोचनकुटुंबिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये ॥६|| आचार्यश्री तथा भारतीय संस्कृतीच्या एका वेगळ्याच वैज्ञानिकतेने थक्क करणारा हा श्लोक. स्मरेत्प्रथमपुष्पिणीं- या त्रिभुवन स्वरूप लतेवर आलेले पहिले पुष्प असणाऱ्या जगदंबेचे स्मरण करावे. रुधिरबिन्दुनीलांबरां- रक्त बिंदू प्रमाणे निल वस्त्र धारण केलेली. प्रथम क्षणी आपल्याला हे वर्णन विचित्र वाटेल. पण त्यामागे फार मोठे वैज्ञानिक सत्य आहे. […]
कुचांचितविपंचिकां कुटिलकुंतलालंकृतां , कुशेशयनिवासिनीं कुटिलचित्तविद्वेषिणीम् | मदारुणविलोचनां मनसिजारिसंमोहिनीं , मतंगमुनिकन्यकां मधुरभाषिणीमाश्रये ॥५|| पूज्यपाद आचार्यश्रींची प्रतिभा इतकी अलौकिक आहे की ते सहज बोलत जातात आणि अलंकार आपोआप प्रगट होतात. आता याच श्लोकात पहा, प्रथम दोन्ही चरणाच्या प्रत्येक शब्दाच्या आरंभी क आणि पुढील दोन चरणांच्या प्रत्येक शब्दाच्या आरंभी म अक्षराने किती सुंदर अनुप्रास साधला आहे? कुचांचितविपंचिकां- मंडळाच्या मध्यभागी […]
कदंबवनमध्यगां कनकमंडलोपस्थितां, षडंबरुहवासिनीं सततसिद्धसौदामिनीम् | विडम्बितजपारुचिं विकचचंद्रचूडामणिं , त्रिलोचनकुटुंबिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये ॥४|| महाविद्या श्री त्रिपुरसुंदरीचे अतुलनीय वैभव सांगतांना पूज्यपाद आचार्यश्री म्हणतात, कदंबवनमध्यगां- कदंब वृक्षाच्या अर्थात कल्पवृक्षांच्या वनामध्ये निवास करणारी. कनकमंडलोपस्थितां- कनक अर्थात सोन्यापासून मंडल म्हणजे वर्तुळाकार आसनावर विराजमान असणारी. मंडल हे पूर्णत्वाचे, अखंडत्वाचे प्रतीक आहे. वर्तुळ ज्या बिंदूपासून आरंभ होते त्याच बिंदूवर समाप्त होते. स्वतःतच परिपूर्ण असणे […]
कदंबवनशालया कुचभरोल्लसन्मालया, कुचोपमितशैलया गुरुकृपालसद्वेलया | मदारुणकपोलया मधुरगीतवाचालया , कयापि घननीलया कवचिता वयं लीलया ॥३|| श्रीविद्या, श्रीकामेश्वरी, श्रीराजराजेश्वरी अशा विविध नावांनी शास्त्र जिची आराधना करते अशा आई जगदंबा त्रिपुरसुंदरी चे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, कदंबवनशालया- कदंब वृक्षाच्या फांद्यांनी निर्माण केलेल्या घरात निवास करणारी. कदंब वृक्ष हा शाश्वताचे, चिरंतनाचे प्रतीक. त्यामुळे आईच्या चिरंतनत्वांचा विचार […]
कदंबवनवासिनीं कनकवल्लकीधारिणीं, महार्हमणिहारिणीं मुखसमुल्लसद्वारुणींम् | दया विभव कारिणी विशदरोचनाचारिणी, त्रिलोचन कुटुम्बिनी त्रिपुर सुंदरी माश्रये ॥२|| परांबा त्रिपुरसुंदरीच्या अलौकिक वैभवाला विशद करताना आचार्यश्री म्हणतात, कदंबवनवासिनीं- कदंब वृक्षाला स्वर्गीय वृक्ष, कल्पवृक्ष असे म्हणतात. अशा वृक्षांच्या वनामध्ये निवास करणारी. कल्पवृक्षाच्या वनातच निवास केल्यावर कोणतीही इच्छा क्षणात पूर्ण होणार. मग उरलेल्या वेळेचे करायचे काय? तर शास्त्र सांगते साहित्य संगीत आणि […]
कदंबवनचारिणीं मुनिकदम्बकादंबिनीं, नितंबजितभूधरां सुरनितंबिनीसेविताम् | नवंबुरुहलोचनामभिनवांबुदश्यामलां, त्रिलोचनकुटुम्बिनीं त्रिपुरसुंदरीमाश्रये ॥१|| भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज भगवती त्रिपुरसुंदरीचे उपासक होते. शाक्त संप्रदायात वर्णन केलेल्या दशमहाविद्यांपैकी हे सर्वश्रेष्ठ स्वरूप आहे त्रिपुरसुंदरी. बाला, षोडशी,ललितांबा अशा विविध स्वरूपात तिचे पूजन केले जाते. या आपल्या आराध्य स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, कदंबवनचारिणीं- कदंब वृक्ष हा शाश्वताचे प्रतीक आहे. चिरंतन, सनातन शक्ती […]
शब्दब्रह्ममयी चराचरमयी ज्योतिर्मयी वाङ्मयी नित्यानन्दमयी निरञ्जनमयी तत्त्वंमयी चिन्मयी । तत्त्वातीतमयी परात्परमयी मायामयी श्रीमयी सर्वैश्वर्यमयी सदाशिवमयी मां पाहि मीनाम्बिके ॥ ८ ॥ आई मीनाक्षीच्या तात्त्विक स्वरूपाचे शास्त्रीय वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, शब्दब्रह्ममयी- वेद शास्त्र यामध्ये असणाऱ्या शब्दांना शब्दब्रह्म असे म्हणतात. या सगळ्याच्या द्वारे जिचे वर्णन केल्या जाते अशी. चराचरमयी- चर म्हणजे सजीव तर अचर म्हणजे निर्जीव. या […]
वीणानादनिमीलितार्धनयने विस्रस्तचूलीभरे ताम्बूलारुणपल्लवाधरयुते ताटङ्कहारान्विते । श्यामे चन्द्रकलावतंसकलिते कस्तूरिकाफालिके पूर्णे पूर्णकलाभिरामवदने मां पाहि मीनाम्बिके ॥ ७॥ आई जगदंबा मीनाक्षीच्या कलारसिक स्वरूपाचे वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, वीणानादनिमीलितार्धनयने – वीणानादामुळे नेत्र अर्धवट मिटून घेतलेली. शरीरविज्ञान सांगते की आपल्याला प्राप्त होणाऱ्या संवेदनां पैकी ८३% संवेदना केवळ डोळ्यांनी प्राप्त होतात. त्यामुळे आपल्या लक्षात येईल की अन्य कोणत्याही ज्ञानेंद्रियांनी […]