गन्धर्वामरयक्षपन्नगनुते गङ्गाधरालिङ्गिते गायत्रीगरुडासने कमलजे सुश्यामले सुस्थिते । खातीते खलदारुपावकशिखे खद्योतकोट्युज्ज्वले मन्त्राराधितदैवते मुनिसुते मां पाही मीनाम्बिके ॥ ५ ॥ आई जगदंबा मीनाक्षीच्या दिव्यतम वैभवाचे वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, गन्धर्व- स्वर्ग लोकांमध्ये गायन,वादन कलेत निपुण असणारे दिव्य कलाकार. अमर- स्वर्गामध्ये निवास करणाऱ्या देवता. देवतांचे आयुर्मान अतिविशाल असल्याने आपल्या सापेक्षरीत्या ते मृत्यू पावत नसल्याने त्यांना […]
ब्रह्मेशाच्युतगीयमानचरिते प्रेतासनान्तस्थिते पाशोदङ्कुशचापबाणकलिते बालेन्दुचूडाञ्चिते । बाले बालकुरङ्गलोलनयने बालार्ककोट्युज्ज्वले मुद्राराधितदैवते मुनिसुते मां पाहि मीनाम्बिके ॥ ४ ॥ आई जगदंबेच्या दिव्य वैभवाचे वर्णन करतांना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, ब्रह्मेशाच्युतगीयमानचरिते – ब्रह्म म्हणजे श्रीब्रह्मदेव, ईश म्हणजे श्रीशंकर तथा अच्युत म्हणजे श्रीविष्णू यांच्याद्वारे अखंड जिच्या चरित्राचे गायन केल्या जाते अशी. प्रेतासनान्तस्थिते- भगवान महाकाल निश्चल स्वरूपात स्थिर रहात […]
कोटीराङ्गदरत्नकुण्डलधरे कोदण्डबाणाञ्चिते । शिञ्जन्नूपुरपादसारसमणीश्रीपादुकालंकृते मद्दारिद्र्यभुजंगगारुडखगे मां पाहि मीनाम्बिके ॥ ३॥ आई जगदंबेचे अद्भुत वैभव वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, कोटीराङ्गदरत्न- कोटी अर्थ वेगवेगळ्या प्रकारचे, अत्यंत मौल्यवान रत्नांनी घडविलेले अंगद म्हणजे बाजूबंद, कुण्डलधरे- कुंडलांना धारण करणाऱ्या, कोदण्डबाणाञ्चिते- कोदंड अर्थात धनुष्य. हे भगवान विष्णूंच्या धनुष्याचे नाव. दंड अर्थात सत्ता. अधिकार. ज्यावर कोणाचाही दंड चालत नाही ते कोदंड. आई जगदंबेची […]
चक्रस्थेऽचपले चराचरजगन्नाथे जगत्पूजिते आर्तालीवरदे नताभयकरे वक्षोजभारान्विते । विद्ये वेदकलापमौलिविदिते विद्युल्लताविग्रहे मातः पूर्णसुधारसार्द्रहृदये मां पाहि मीनाम्बिके ॥ २ ॥ आई जगदंबा मीनाक्षीच्या स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, चक्रस्थे- आई जगदंबेचे यंत्र स्वरूप असणाऱ्या श्रीयंत्रा मध्ये निवास करणाऱ्या, अचपले- अतीव स्थिर. शांत. चंचलता अर्थात कृतीचा संबंध आहे काहीतरी प्राप्त करण्याशी. आपण तीच गोष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो जी […]
श्रीविद्यॆ शिववामभागनिलयॆ श्रीराजराजार्चितॆ श्रीनाथादिगुरुस्वरूपविभवॆ चिन्तामणीपीठिकॆ । श्रीवाणीगिरिजानुताङ्घ्रिकमलॆ श्रीशांभवि श्रीशिवॆ मध्याह्नॆ मलयध्वजाधिपसुतॆ मां पाहि मीनाम्बिकॆ ॥ १ ॥ भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी मीनाक्षी पंचरत्नम् सोबतच मीनाक्षी स्तोत्रम् या नावाची ही एक नितांत सुंदर रचना साकारली आहे. यात आई मीनाक्षीचे वैभव वर्णन करतांना आचार्यश्री म्हणतात, श्रीविद्यॆ- शाक्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान सांगणाऱ्या श्रीविद्या स्वरुपिणी. शिववामभागनिलयॆ- भगवान शंकरांच्या डाव्या […]
ॐकार. प्रणव. वैश्विक शक्तीचा आद्यतम हुंकार. सगुना निर्गुणाची जणू काही सीमारेषा.लिखाणाचा एक आकार असल्यामुळे सगुण, साकार. नादब्रह्म हे स्वरूप असल्याने निर्गुण निराकार. आई जगदंबा अशी ओंकारस्वरूपिणी, प्रणवरूपिणी आहे. तिच्या त्याच स्वरूपाचे वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, […]
सर्वच देवतांना प्रिय असणारे पुष्प म्हणजे कमळ. चिखलात जन्माला येऊन सूर्याच्या तेजाच्या दिशेने झेपावण्याची त्याची वृत्ती. त्यावर गुंजारव करणार्या भ्रमरांचा शब्द, त्याचा कोमल स्पर्श, त्याचे अत्यंत आकर्षक रूप, त्यामध्ये असणाऱ्या मकरंदाचा रस आणि त्याचा नितांत मनोहारी गंध. अशा पाचही अंगाने आनंद देणारे हे पुष्प. आई जगदंबा तशीच सर्वांगसुंदर आणि सर्वांगाने आनंद देणारी आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक अवयवाला कमळाची उपमा देताना आचार्य श्री म्हणतात, […]
वारणाननमयूरवाहमुखदाहवारणपयोधरां चारणादिसुरसुन्दरीचिकुरशेखरीकृतपदाम्बुजाम् । कारणाधिपतिपञ्चकप्रकृतिकारणप्रथममातृकां वारणान्तमुखपारणां मनसि भावयामि परदेवताम् ॥ ६॥ कोणत्याही स्त्रीचे खरे वैभव म्हणजे तिचे मातृवात्सल्य. जगज्जननी आई जगदंबेच्या त्याच मातृवात्सल्याचा आधार करीत, तिचे वर्णन करतांना आचार्यश्री म्हणतात, वारणानन – वारण शब्दाचा एक अर्थ आहे हत्ती. त्याचे आनन म्हणजे मुख. तसे ज्यांचे मुखकमल आहेत ते भगवान गजानन. मयूरवाह- मयूर हे ज्यांचे वाहन आहे असे. अर्थात […]
कुण्डलत्रिविधकोणमण्डलविहारषड्दलसमुल्लस- त्पुण्डरीकमुखभेदिनीं च प्रचण्डभानुभासमुज्ज्वलाम् । मण्डलेन्दुपरिवाहितामृततरङ्गिणीमरुणरूपिणीं मण्डलान्तमणिदीपिकां मनसि भावयामि परदेवताम् ॥ ५॥ आई जगदंबेच्या परमप्रकाशित, दिव्य रूपाचे वर्णन करतांना पूज्यपाद जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, कुण्डलत्रिविधकोणमण्डलविहार- आई जगदंबेच्या कोणत्याही यंत्राच्या मध्यभागी असणाऱ्या त्रिकोण मंडल अर्थात स्थानामध्ये , कुंडल अर्थात आपल्याच आनंदामध्ये विहार करणारी, षड्दलसमुल्लसत्पुण्डरीकमुखभेदिनीं – षट्दल म्हणजे सहा पाकळ्यांचे, समुल्लसद्- प्रफुल्लित, पूर्णपणे उमललेल्या, पुंडरीक अर्थात कमळ. […]