भूरिभारधरकुण्डलीन्द्रमणिबद्धभूवलयपीठिकां वारिराशिमणिमेखलावलयवह्निमण्डलशरीरिणीम् । वारिसारवहकुण्डलां गगनशेखरीं च परमात्मिकां चारुचन्द्ररविलोचनां मनसि भावयामि परदेवताम् ॥ ४॥ आई जगदंबेच्या अतीविराट विश्वरूपाचे इथे वर्णन साकारण्यात आले आहे. विश्वातील अतीव वैभवशाली पंचमहाभूते ही जणूकाही आई जगदंबेची अवयव वा आभूषणे आहेत असे अतिभव्यतम वर्णन करतांना आचार्य श्री म्हणतात, भूरिभारधरकुण्डलीन्द्रमणिबद्धभूवलयपीठिकां- भूरी म्हणजे प्रचंड. भार अर्थात वजन. सगळ्यात जास्त वजन कशाचे? तर या पृथ्वीचे. त्याला […]
स्मेरचारुमुखमण्डलां विमलगण्डलम्बिमणिमण्डलां हारदामपरिशोभमानकुचभारभीरुतनुमध्यमाम् । वीरगर्वहरनूपुरां विविधकारणेशवरपीठिकां मारवैरिसहचारिणीं मनसि भावयामि परदेवताम् ॥ ३॥ आई जगदंबेच्या अतिदिव्य सौंदर्याचे आणि वैभवाचे लोकविलक्षणत्व विशद करतांना भगवान शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, स्मेरचारुमुखमण्डलां- स्मेर शब्दाचा अर्थ आहे दंतपंक्ती किंचित दिसतील अशा प्रकारचे मंद हास्य. अशा स्मेर हास्याने, चारू म्हणजे अत्यंत आकर्षक मुखकमलाने आई जगदंबा युक्त आहे. अशा अत्यंतिक सुंदरतम हास्याने युक्त असणार्या, […]
गन्धसारघनसारचारुनवनागवल्लिरसवासिनीं सान्ध्यरागमधुराधराभरणसुन्दराननशुचिस्मिताम् । मन्थरायतविलोचनाममलबालचन्द्रकृतशेखरीं इन्दिरारमणसोदरीं मनसि भावयामि परदेवताम् ॥ २॥ आई जगदंबेच्या दिव्य शृंगाराचे वर्णन करताना भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, गन्धसार- अर्थात मलय पर्वतावर निर्माण होणारे उत्तम चंदन. घनसार- म्हणजे कापूर, चारुनवनागवल्लि- सुंदर कोवळ्या विड्याच्या पानांचा, रसवासिनीं – रस धारण करणाऱ्या, आचार्य श्री येथे बाह्य आणि अंतर्गत अशा दोन्ही शृंगारांचा विचार करीत आहेत. चंदनाचा […]
हारनूपुरकिरीटकुण्डलविभूषितावयवशोभिनी कारणेश्वरमौलिकोटिपरिकल्प्यमानपदपीठिकाम् । कालकालफणिपाशबाणधनुरङ्कुशामरुणमेखलां फालभूतिलकलोचनां मनसि भावयामि परदेवताम् ॥ १॥ नवरत्न शब्दाचा संबंध आहे नवग्रहांशी. सूर्यापासून तेजाचे ग्रहण करतात म्हणून त्यांना ग्रह म्हणतात. मग सूर्याला ग्रह का म्हणायचे? तर तो आई जगदंबे पासून तेज ग्रहण करतो. या ग्रहांच्या तेजाने चमकतात नवरत्न. सोप्या शब्दात जगातील समस्त चमकदार, आकर्षक अर्थात सुखदायक गोष्टींच्या मागे आहे आई जगदंबा. तिच्या दिव्य […]
नानायोगिमुनीन्द्रहृन्निवसतीं नानार्थसिद्धिप्रदां नानापुष्पविराजितांघ्रियुगलां नारायणेनार्चिताम् । नादब्रह्ममयीं परात्परतरां नानार्थतत्वात्मिकां मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ ५॥ आई श्रीमीनाक्षीच्या मूलचैतन्यस्वरूपी आदिशक्ती स्वरूपाचे विशेष वर्णन करताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, नानायोगिमुनीन्द्रहृन्निवसतीं – कर्म,भक्ती तथा ज्ञानाच्याद्वारे भगवंताशी जुळतात त्यांना योगी असे म्हणतात. जे भगवंताच्या दिव्य स्वरुपाचे मनन करतात त्यांना मुनी असे म्हणतात. अशा असंख्य योगी आणि मुनी श्रेष्ठांच्या हृदयामध्ये निवास […]
श्रीमत्सुन्दरनायकीं भयहरां ज्ञानप्रदां निर्मलां श्यामाभां कमलासनार्चितपदां नारायणस्यानुजाम् । वीणावेणुमृदङ्गवाद्यरसिकां नानाविधामम्बिकां मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ ४॥ श्रीमत्सुन्दरनायकीं- मदुराई येथे असणाऱ्या मीनाक्षी मंदिरामध्ये भगवान श्रीशंकरांचे श्रीनटराज स्वरूप विद्यमान आहे. या स्वरूपाला तेथे श्री सुंदरेश्वर असे म्हणतात. त्या श्रीमान भगवान सुंदरेश्वरांची नायिका देवी श्री मीनाक्षी श्रीमत्सुन्दरनायकी स्वरूपात वंदिली जाते. भयहरां – भक्तांच्या भीतीचे हरण करणारी. सगळ्यात मोठी भीती […]
श्रीविद्यां शिववामभागनिलयां ह्रींकारमन्त्रोज्ज्वलां श्रीचक्राङ्कित बिन्दुमध्यवसतिं श्रीमत्सभानायकीम् । श्रीमत्षण्मुखविघ्नराजजननीं श्रीमज्जगन्मोहिनीं मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ ३॥ श्रीविद्यां- आई जगदंबेच्या तात्त्विक स्वरूपाचे निरूपण करणाऱ्या शास्त्राला श्रीविद्या असे म्हणतात. शिववामभागनिलयां- भगवान शंकरांच्या अर्ध्या डाव्या भागामध्ये निवास करणारी. स्त्री आणि पुरुषाच्या शरीराचा विचार करताना शास्त्रात पुरुषाचे उजवे तर स्त्रीचे डावे अंग पवित्र स्वरूपात वर्णन केले आहे. पुरुष सामान्यतः बुद्धिप्रधान असतो […]
मुक्ताहारलसत्किरीटरुचिरां – पूर्णेन्दुवक्त्र प्रभां शिञ्जन्नूपुरकिंकिणिमणिधरां पद्मप्रभाभासुराम् । सर्वाभीष्टफलप्रदां गिरिसुतां वाणीरमासेवितां मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ २॥ आई जगदंबेच्या लोकविलक्षण सौंदर्याचे तथा तिच्या दिव्य तात्त्विक स्वरूपाचे वर्णन करतांना, आचार्य श्री प्रथम दोन चरणात आईने धारण केलेल्या अलंकारांचे आणि त्यांनी फुललेल्या सौंदर्याचे वर्णन करीत आहेत. ते म्हणतात, मुक्ताहारलसत्किरीटरुचिरां- मोत्यांचे हार लटकत असल्यामुळे अधीकच शोभून दिसणाऱ्या मुकुटाने सुशोभित असणारी. […]
उद्यद्भानु सहस्रकोटिसदृशां केयूरहारोज्ज्वलां बिम्बोष्ठीं स्मितदन्तपंक्तिरुचिरां पीताम्बरालंकृताम् । विष्णुब्रह्मसुरेन्द्रसेवितपदां तत्वस्वरूपां शिवां मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ १॥ मीन म्हणजे मासोळी. अक्ष म्हणजे डोळे. जिचे डोळे मासोळी प्रमाणे लांब, दोन्हीकडे निमुळते, त्यातही कानाकडे अधिक वाढलेले आणि मध्यभागी विशाल असतात ती मीनाक्षी. मासोळीचे डोळे टपोरे असतात. तसे जिचे नेत्र ती मीनाक्षी. अशा प्रकारच्या सुंदर नेत्रांनी सुशोभित आई जगदंबे चे […]
प्रातःकाले भावविशुद्धः प्रणिधाना- द्भक्त्या नित्यं जल्पति गौरिदशकं यः । वाचां सिद्धिं सम्पदमग्र्यां शिवभक्तिं तस्यावश्यं पर्वतपुत्री विदधाति ॥ ११॥ या गौरीदशकम् नामक स्तोत्राचे समापन करतांना या स्तोत्राच्या पठनाचा विधी आणि स्तोत्र पठनाचे लाभ सांगणाऱ्या फलश्रुती स्वरूप असणाऱ्या या श्लोकात आचार्यश्री म्हणतात, प्रातःकाले – या स्तोत्राचे पठन प्रात:काळी अर्थात मंगलमय वातावरणात, प्राधान्यक्रमाने करावे. भावविशुद्धः- मनात अत्यंत शुद्ध भाव […]