मानवी जीवनात प्राप्तव्य अशा चार अत्यंत श्रेष्ठ गोष्टींना पुरुषार्थ असे म्हणतात. अर्थ म्हणजे मिळवण्याची गोष्ट. पुरुष अर्थात जीवाने मिळवण्याच्या या चार गोष्टी. धर्म-अर्थ-काम-मोक्ष अशा या चारही पुरुषार्थांना प्रदान करणाऱ्या आई जगदंबेचे वैभव आचार्यश्री या श्लोकात वर्णन करीत आहेत. […]
सौंदर्य म्हटले की अनिवार्यपणे ज्यांचा विचार येतो ती म्हणजे आभूषणे. आई जगदंबेच्या अशा दिव्य दागिन्यांचे वैभव वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात, नवीनार्क अर्थात् नुकताच उगवलेला म्हणजे सूर्य. त्याचे भ्राज म्हणजे तेज,चकाकी हा त्या दागिन्यांचा स्थायीभाव आहे. […]
आई जगदंबेच्या गळ्यात मंदार पुष्पांचा माळा असतात. मंदार म्हणजे पांढरी रुई. याला शास्त्रात कल्पवृक्ष म्हटले आहे. हा स्वर्गीय वृक्ष. त्याच्या फुलांच्या माळा आईच्या गळ्यात शोभून दिसत आहेत. […]
भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी आई जगदंबेच्या गुणांचे वर्णन करण्याचा संकल्प तर केला. पण त्यांची पंचाईत झाली आहे की हे वर्णन करावे तरी कसे? […]
जगज्जननी माॅ त्रिपुरसुंदरी आदिशक्तीचे स्तवन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य महाराज ज्या अपूर्व आनंदाचा अनुभव घेत आहेत त्या आधारे त्यांनी या स्तोत्राचे आनंदलहरी असेच नामकरण केले आहे. […]
ज्वलत् म्हणजे प्रज्वलित असलेला, ज्वालांनी युक्त असलेला. वह्नि म्हणजे अग्नी. तर कांती म्हणजे शरीराचे तेज, चमक. जिच्या शरीराची चमक उज्वल अग्नीप्रमाणे देदिप्यमान आहे अशी ती ज्वलत्कान्तिवह्नि. […]