आत्मपूजा उपनिषदाचं हे सूत्र सांगतं की नि:संशय जाणणं हेच आसन ! फक्त तीन शब्दात पातंजलीच्या संपूर्ण अष्टांग योगाला, हे एकच सूत्र पार करून जातं. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी; असा उभा जन्म जाईल इतका आणि क्लेशदायी प्रवास करण्यापेक्षा; फक्त ठामपणे स्वतःला जाणलं आणि त्यावर स्थिर राहिलं की विषय संपला ! […]
समस्तलोकशङ्करंनिरस्तदैत्यकुञ्जरं ! दरेतरोदरं वरं वरेभवक्त्रमक्षरम् !! कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं ! मनस्करं नमस्कृतां नमस्करोमि भास्वरम् !! ३!! समस्तलोकशङ्कर- शम् म्हणजे कल्याण. ते कल्याण जे करतात ते शंकर. समस्त लोक अर्थात सर्व लोकांचे किंवा सर्व विश्वाचे कल्याण करतात म्हणून मोरयांना समस्तलोकशङ्कर असे म्हणतात. निरस्तदैत्यकुञ्जर- कुंजर म्हणजे हत्ती. दैत्यकुंजर अर्थात हत्तीप्रमाणे अत्यंत बलशाली असणारे दैत्य. भगवान श्रीगणेश आणि […]
हे सर्व ज्या गणेशांच्या कृपेने मिळणार त्यांच्यासाठी आचार्य शेवटच्या ओळीत शब्द वापरतात “एकवर.” अर्थात हे सर्व वर देण्यास एकटे श्रीगणेशच समर्थ आहेत. त्या श्रीगणेशांना सादर वंदन असो. […]
नतेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं !नमत्सुरारिनिर्जरं नताधिकापदुद्धरम् !! सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं ! महेश्वरं तमाश्रये परात्परं निरंतरम् !!२!! नतेतरातिभीकर – नत अर्थात वंदन करणारे. नतेतर अर्थात वंदन न करणारे म्हणजे अभक्त,दृष्ट, राक्षसी वृत्तीचे. त्यांच्यासाठी भीकर अर्थात भयानक असणारे ते, नतेतरातिभीकर. नवोदितार्कभास्वर- नवोदित अर्थात नुकत्याच उगवलेल्या,अर्क अर्थात सूर्याप्रमाणे, भास्वर अर्थात तेजस्वी असणारे. नुकत्याच उगवलेल्या सूर्याप्रमाणे लाल रंग असणारे, तसा प्रकाशाचा, […]
भगवान जगदगुरु आदि शंकराचार्यांचे स्तोत्र वाङमय म्हणजे परमानंदाचा शब्दावतार. यापैकी एकेका श्लोकाचा दररोज रसास्वाद घेण्याचा प्रयत्न करुया, विद्यावाचस्पति प्रा स्वानंद गजानन पुंड यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेल्या श्री शांकर स्तोत्ररसावली या आध्यात्मिक सदरातून….. मुदा करात्तमोदकंसदा विमुक्तिसाधकं ! कलाधरावतंसकंविलासिलोकरञ्जकम् !! अनायकैकनायकं विनाशितेभदैत्यकं ! नताशुभाशुनाशकं नमामि तं विनायकम् !!१!! भगवान श्री गणेशांच्या दिव्य वैभवाचे आनंदगायन करताना भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य […]
सर्व कर्म निराकारणं ही चित्तदशा प्राप्त होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनानं कृत्य करण्याची सवय या क्षणापासनं सोडायला हवी. मनानं कोणतंही कृत्य असंभव आहे; खरं तर मनानं काम करणंच व्यर्थ आहे. जे काही काम होतं ते शरीरानं होतं आणि मनाशी त्याचा मेळ असतो; केवळ मनानं काम हा निव्वळ कालापव्यय आहे. […]
आत्मपूजा उपनिषद केवळ १५ श्लोकांचं आहे आणि त्याच्या प्रत्येक श्लोकात स्वतःचा उलगडा घडवून आणण्याची किमया आहे; म्हणून ही लेखमाला. : सर्व प्रस्थापित अध्यात्मात मी हा एकमेव अडथळा मानला गेला आहे. या मी लाच सर्वेजन अहंकार समजतात आणि तो हटवण्यात साधकांचं आयुष्य वेचलं जातं; तरी तो हटत नाहीच. […]
भाग २ – गंगेची स्तुती व माहात्म्य अनेक कवी, विचारवंत, लेखक यांच्या कलाकृतीचा केंद्रबिंदू राहिलेले आहेत. या सर्व रचनांमध्ये जगन्नाथ पंडिताने रचलेले गंगालहरी हे आधुनिक संस्कृत काव्यांमधील मुकुटमणीच म्हटले पाहिजे. गंगेच्या स्तवनपर हे काव्य अत्यंत रसाळ, पदलालित्यपूर्ण व भावपूर्ण आहे. […]
हरि ॐ ब्रह्मांनी जेव्हा ब्रह्मांड निर्माण केले तेव्हा त्या ब्रह्मांडाला संस्कुतीची रित देण्यासाठी आणि संस्कारांचा लेप देण्यासाठी स्वतःचे अस्तित्व साकारले ते अस्तित्व म्हणजे गुरु… […]
शरिरामध्ये अस्तित्वात असणार्या प्राणशक्ति वर केलेली साधना म्हणजे प्राणभक्ती…. प्राणभक्ती ध्यान केल्याने शरिराची रोगप्रतिकार क्षमता वाढते आणि आपल्या शरिराला आजारांपासुन मुक्ती मिळते. […]