श्री मुदगल पुराणाने वर्णिलेल्या अष्टविनायकांची मूळ स्थाने भारताच्या आठ दिशेला आठ आहेत. विशेष म्हणजे श्रीक्षेत्र मोरगाव येथे मोरयाच्या मंदिरात आठ दिशांना या आठ विनायकांच्या मूर्ती स्थापित आहेत. भगवान श्रीमयुरेश्वर यांच्या पूजनानंतर पूर्वेकडून अनुक्रमे भगवान श्री वक्रतुंड, श्री एकदंत, श्री महोदर, श्री गजानन, श्री लंबोदर, श्री विकट,श्री विघ्नराज आणि श्री धूम्रवर्ण अशा या आठ विनायकांची पूजन करायचे असते. वेगळ्या शब्दात एकाच मंदिरात संपूर्ण भारताची यात्रा करण्याची सुविधा आहे श्रीक्षेत्र मोरगाव. […]
श्री मुद्गल पुराणात अत्यंत मोजक्या वेळेसाठी झालेल्या गणेशांच्या अवतारांपैकी एक अवतार श्री शूर्पकर्ण अवतार. या अवताराचे नाव मोठे सुंदर आहे. शूर्पकर्ण. येथे कान सुपासारखे, म्हणताना केवळ त्याच्या आकाराचा नव्हे तर गुणांचा विचार महत्त्वाचा आहे. […]
श्री मुद्गल पुराणाचा चौथा खंड चतुर्थी वर्णनाला समर्पित आहे. बारा महिन्यात येणाऱ्या प्रत्येकी दोन अशा चोवीस आणि अधिक मासातील दोन अशा सव्वीस चतुर्थीच्या प्रत्येकी दोन अशा बावन्न कथा तेथे पाहावयास मिळतात. […]
श्रीगणेशांचा आवडता रंग कोणता? तर लाल. त्यांना गंध कोणत्या रंगाचे लावायचे? तर लाल. त्यांचे आवडते फूल कोणत्या रंगाचे? तर लाल. त्यांचे आवडते वस्त्र कोणत्या रंगाचे? तर लाल. पण लालच का? […]
श्री मुद्गल पुराण सांगते की हे सर्व विकार आपल्याला “सह-ज” रूपात मिळाले आहेत. अर्थात हे सर्व विकार जन्मापासून आपल्यासोबत आहेत. खरेतर जन्माच्या आधीपासून सोबत आहेत. या विकारांनी, या वासनांनी युक्त असल्यामुळे जन्माला यावे लागते असे शास्त्र सांगते. […]
श्री गणेशांच्या बाबतीत जो विषय सर्वाधिक वेळा विचारला जातो, किंवा ज्या बाबतीत गणेश उपासकांमध्ये सर्वाधिक धास्तीचे वातावरण आहे तो विषय म्हणजे उजव्या सोंडेचा गणपती. […]
त्रेतायुगात झालेल्या श्री गणेशा यांच्या मयुरेश्वर अवताराचे वाहन मोर वर्णिले आहे. पुन्हा कालचाच प्रश्न पडतो की मोरावर कसे बसता येईल. तर लक्षात घ्या की एक भगवान शंकराचा नंदी दुसरा देवी लक्ष्मीचा हत्ती आणि तिसरा यमराजाचा रेडा सोडला तर कोणत्याही देवतेच्या वाहनावर बसताच येत नाही. […]